Success Story Saam Tv
बिझनेस

Success Story: वडिलांकडून कर्ज... लहान खोलीत बिझनेसला सुरुवात, दोन बहिणींनी ३५०० कोटींचं साम्राज्य उभारले!

Theobroma Owner Success Story: थिओब्रोमा हा ब्रँड सर्वांनाच माहित आहे. या ब्रँडची सुरुवात दोन बहिणींनी केली आहे. या दोघींनी आपल्या वडिलांकडून लोन घेऊन व्यवसाय सुरु केला होता.

Siddhi Hande

आजकाल अनेकांचे स्वतः चा बिझनेस सुरु करण्याचे स्वप्न असते.परंतु स्वतः चा बिझनेस सुरु करायचा म्हटल्यावर खूप भांडवल गरजेचे असते. यासाठी लोन घ्यावे लागते किंवा घरातील सदस्यांकडून पैसे घ्यावे लागतात. असेच पैसे केनाज आणि टीना मेसमान या दोन बहि‍णींनी आपल्या वडिलांकडून पैसे घेऊ स्वतः चा व्यवसाय सुरु केला. आज या कंपनीची किंमत कोट्यवधींच्या घरात आहे.

केनाज आणि टीना यांनी थिओब्रोमा ही कंपनी सुरु केली. हा एक बेकरी बिझनेस आहे.देशभरात जवळपास २२५ आउटलेट या ब्रँडे आहेत. आज या कंपनीचे वॅल्युएशन ३५०० कोटी रुपये आहे. दोन बहि‍णींनी आपल्या स्वतःचा हिम्मतीवर एवढा मोठा बिझनेस सुरु केला आहेय

२००४ मध्ये केनाजला दुखापत झाली होती. तेव्हा तिने नोकरी सोडली होती. ती पेस्ट्री शेफ म्हणून काम रत होती. तिला वेगवेगळे पदार्थ बनवायला खूप आवडायचे. १६ वर्षांची असताना ती फ्रान्स टूरला गेली होती. तेव्हाच तिने शेफ बनायचे ठरवले. तिने IHM मुंबई आणि ओबेरॉय सेंटर ऑफ लर्निंग अँड डेव्हलपमेंटमध्ये ग्रॅज्युएशन केले.त्यानंतर २००४ मध्ये थियोब्रोमा पेस्ट्रीचे दुकान सुरु केली.

या दोन्ही बहि‍णींकडे बेकींगचा चांगला अनुभव होता. त्यामुळे त्यांनी बिझनेस सुरु करायचे ठरवले. त्यांनी आपल्या वडिलांकडून १.५ कोटी रुपयांचे कर्ज घेतेल. त्यानंतर त्यांनी बिझनेस सुरु केली. (Theobroma Success Story)

या दोघींनी मुंबईतील कुलाबा येथे पहिलं आउटलेट सुरु केलं.या ब्रँडचं नाव कसं पडलं यामागेही रंजक कहाणी आहे. त्यांच्या मित्रांनी त्यांना सांगितले होती की, थिओब्रोमा नाव ठेवा.थिओसचा ग्रीक अर्थ ईश्वर असा आहे आणि ब्रोमा म्हणजे भोजन असे आहे. त्यामुळे देवतांचे भोजन असा अर्थ या शब्दाचा होतो.

मिडिया रिपोर्टनुसार, थिओब्रोमा कंपनीची किंमत ३,५०० कोटी रुपये आहे. थिओब्रोमाच्या आउटलेटमध्ये तुम्हाला केक, पेस्ट्री, बेकरी प्रोडक्ट्स मिळतात. (Success Story)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CM Fadnavis: देवेंद्र फडणवीसांना दिलासा; याचिकेतून विधानसभा निवडणुकीतील विजयाला दिलं होतं आव्हान

Maharashtra Live News Update: धाराशिवात १७ मुलींना झाली विषबाधा

The Hunt: माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येवर आधारित 'द हंट' ही मालिका तुम्ही कधी आणि कुठे पाहू शकता?

Apoorva Nemalekar : “प्रवास सोप्पा नव्हता...'' मालिकेला निरोप देताना अपूर्वाची भावूक पोस्ट व्हायरल

Rupali Bhosle: 'रूप तेरा मस्ताना' रूपाली भोसलेचे फोटो पाहून तुम्हीही हेच म्हणाल...

SCROLL FOR NEXT