Income Tax Refund Saam Tv
बिझनेस

Income Tax Refund: टॅक्स रिफंड मिळाल्यानंतर या चुका अजिबात करू नका, अन्यथा होऊ शकतं लाखोंचं नुकसान

Tax Saving Tips: आयटीआर फाइल केल्यानंतर आता अनेक करदात्यांच्या अकाउंटला रिफंडचे पैसे जमा होत आहेत. रिफंडचे पैसे आल्यानंतर तुम्ही आतापासूनच पुढच्या वर्षी करातून कशी सूट मिळेल, याकडे लक्ष द्यायला हवे.

Siddhi Hande

करदात्यांचे आयटीआर फाइल केल्यानंतर आता रिफंड कधी येणार याकडे लक्ष लागले आहे. आयटीआर फाइल न केलेल्या लोकांना पुढील काही महिन्यात आयटीआर फाइल करता येणार आहे. ज्या लोकांना आयटीआर परतावा मिळाला आहे त्यांनी पुढच्या वर्षीचा आयटीआर वाचवण्यासाठी बचतीला सुरुवात करा. तुम्ही लहान लहान गोष्टींमधून आयटीआर वाचवू शकतात. (Tax Saving Tips)

मुलांच्या शिक्षणासाठीच्या खर्चातून कराची बचत

जर तुमचा मुलगा नर्सरीमध्ये शिकत असेल तर त्याच्या फीवर तुम्ही कर सूटचा दावा करु शकता. तुम्हाला ८० सी कलमाअंतर्गत सूट मिळेल. त्यामुळे तुम्हाला मूलाच्या फीवर कोणत्याही प्रकारचा कर भरावा लागणार नाही.

भाड्याचे पैसे

तुम्ही तुमच्या पालकांसोबत राहत असाल तर घरभाडे भत्त्याचा दावा करु शकत नाही. त्यामुळे तुम्ही तुमच्या पालकांना भाड्याचे पैसे देऊन एचआरए सवलतीचा फायदा घेऊ शकतात.आयकर कलम 10(13) कलमाअंतर्गत पालकांना घरमालक असल्याचे दाखवून HRA वर करापासून सूट मिळवू शकतात.

विमा खरेदी (Insurance)

तुम्ही तुमच्या पालकांसाठी विमा खरेदी केला असेल तर त्या रक्कमेवर कर कपातीचा दावा करु शकतात. तुमचे पालक ६५ वर्षांपेक्षा कमी वयाचे असतील कर २५ हजार रुपयांच्या प्रीमियमवर कर कपातीचा दावा करु शकतात. तर ६५ वर्षांवरील पालकांच्या विम्यावर ५० हजारापर्यंतचा सवलत मिळू शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT