Union Budget 2025 : अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी शनिवारी अर्थसंकल्पात १२ लाख रूपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त असल्याची घोषणा केली. अर्थमंत्र्यांनी १२ लाख रूपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त करण्याची घोषणा करताच अर्थतज्ज्ञही थक्क झाले. याआधी सात लाख रूपयांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही कर नव्हता.
१२ लाख रूपयांपर्यंतची सूट फक्त नवीन कर प्रणाली घेतलेल्यांसाठीच लागू असणार आहे. पण १२ लाख रूपयांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त कसं होईल, त्यातही काही अटीशर्ती आहेत. जर तुमच्याकडे कोणतीही गुंतवणूक नसेल तर तुम्हाला १२ लाख रूपयांच्या उत्पन्नावर १५ टक्के कर लागणार आहे. याआधी ही मर्यादा सात लाख रूपये इतकी होती.
कोणत्या उत्पन्न गटाला किती टॅक्स ?
मोदी सरकारने २०२५-२६ च्या अर्थसंकल्पात नोकरदारवर्गासाठी मोठा निर्णय घेतला. १२ लाख रूपयांपर्यंतचं करमुक्त उत्पन्न हे फक्त नवीन कर प्रणालीनुसार कर भरणाऱ्यांसाठीच आहे. जुन्या पद्धतीने कर भरणाऱ्यांना याचा कोणताही फायदा होणार नाही. म्हणजेच, कलम ८७ ए नुसार (टॅक्स रिबेट), मिळणारी कर सवलन ७ लाखांवरून १२ लाख रूपये इतकी करण्यात आली आहे. नोकरदारवर्गाला याचा सर्वाधिक फायदा होऊ शकतो. पगारदार करदात्यांना ७५ हजार हजार रूपयांचं स्टँडर्ड डिडक्शन (standard deduction) मिळत असल्याने त्यांना १२ लाख ७५ हजार रूपयांवर कर लागणार नाही.
कोण कोणत्या सेक्शननुसार गुंतवणूक केल्यास १२ लाख रूपयांचे उत्पन्न करमुक्त होते?
सेक्शन 80C
पीपीएफ, लाईफ इन्श्युरन्स पॉलिसी प्रीमियम, नॅशनल सेविंग सर्टिफिकेट, इक्विटी लिंक सेविंग स्कीममधली गुंतवणूक, गृहकर्ज
सेक्शन 80CCD
नॅशनल पेन्शन स्कीम
सेक्शन 80E
एज्युकेशन लोन
सेक्शन 80D
मेडिकल इन्शुरन्स - हेल्थ इन्शुरन्स
सेक्शन 24
सेक्शन 80TTA
सेक्शन 80DD
सेक्शन 80DDB
सेक्शन 80G
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.