Tatkal Ticket IRCTC Aadhaar Verification saam tv
बिझनेस

Tatkal Ticket New Rules: तत्काळ तिकीट हवं? आधार व्हेरिफिकेशन आहे महत्त्वाचं, जाणून घ्या Verification ची प्रोसेस

Tatkal Ticket IRCTC Aadhaar Verification: भारतीय रेल्वेने १ जुलै २०२५ पासून तत्काळ तिकिटांच्या बुकिंगसाठी नवीन नियम लागू करण्याचा निर्णय घेतलाय.

Bharat Jadhav

जर तुम्ही भारतीय रेल्वेच्या तत्काळ तिकीट बुकिंग करणार असला तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. आयआरसीटीसीने १ जुलै २०२५ पासून तत्काळ तिकिट बुकिंगसाठी नवीन नियम लागू करण्याचा निर्णय घेतलाय. आता आयआरसीटीसी वेबसाइट किंवा अॅपद्वारे तत्काळ तिकिटे बुक करण्यासाठी आधार पडताळणी अनिवार्य असणार आहे.

एवढेच नाही तर १५ जुलै २०२५ पासून तत्काळ तिकिटे बुक करताना ओटीपी आधारित पडताळणी देखील अनिवार्य असणार आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी तत्काळ बुकिंग सिस्टीममधील या मोठ्या बदलाची माहिती याआधीच दिलीय. १ जुलै २०२५ पासून, जे युझर्सनं आयआरसीटीसी खाते आधारशी जोडलेले आहे. आणि ज्यांनी केवायसी केलीय, तेच वापरकर्ते तत्काळ बुकिंग विंडोच्या पहिल्या ३० मिनिटांत तिकिटे बुक करू शकतील.

"तिकिटे खऱ्या प्रवाशांपर्यंत पोहोचतील आणि दलालांना आळा घालण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आल्याची माहिती रेल्वेमंत्र्यांनी दिली होती.

IRCTC खात्याशी आधार कसे व्हेरिफाय करणार?

ज्या लोकांनी आतापर्यंत IRCTC खात्याशी आधार कार्ड जोडले नसेल तर व्हेरिफिकेशन कसं करायचं हे जाणून घ्या.

आयआरसीटीसी वेबसाइट किंवा मोबाईल अॅपला भेट द्या आणि तुमच्या खात्यात लॉग इन करा.

'My Account’ सेक्शनमध्ये जा आणि Authenticate User पर्याय निवडा

आधार क्रमांक किंवा व्हर्च्युअल आयडी एंटर करा.

‘Verify Details’ वर क्लिक करा.

तुमच्या आधार लिंक केलेल्या मोबाईल नंबरवर एक ओटीपी पाठवला जाईल.

मिळालेला OTP एंटर करा, संमती बॉक्सवर खूण करा आणि 'सबमिट करा' या पर्यायावर क्लिक करा.

जर व्हेरिफिकेशन यशस्वी झाले, तर तुमचे खाते आधारने प्रमाणित केले जाईल. जर ते अयशस्वी झाले, तर स्क्रीनवर एक अलर्ट संदेश दिसेल- अशा परिस्थितीत, माहिती पुन्हा तपासा आणि पुन्हा प्रयत्न करा.

व्हेरिफिकेशन करण्यासाठी ‘My Account’ पर्यायावर बटणावर परत ‘Authenticate User’ वर क्लिक करा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yogesh Kadam : आधी पुण्यातील गुन्हेगारीचा आलेख वाचला; नंतर गृहराज्यमंत्र्यांनी गुन्हे रोखण्याचा सरकारचा 'राणबाण उपाय'च सांगितला

Akola Shocking : दिवसभर ५ वर्षांचा चिमुकला बेपत्ता, नंतर सांडपाण्याकडे लक्ष गेलं; दृश्य पाहून कुटुंब हादरलं

Raj Thackeray : महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री हिंदीसाठी का भांडतोय? राज ठाकरेंचा थेट सवाल

Raj Thackeray : 'मुंबईतल्या समुद्रात डुबे डुबे के मारेंगे'; राज ठाकरेंची भाजप खासदार निशिकांत दुबेंना वार्निंग

Ganapati Special Trains : चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी, गणेशोत्सवानिमित्ताने मध्य रेल्वे चालवणार २५० विशेष गाड्या

SCROLL FOR NEXT