बिझनेस

GST Discount: दसऱ्याला घरी आणा कार; GST कपातीनंतर टाटाच्या या कारवर धमाकेदार डिस्काउंट, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

TATA Tiago: टाटा टियागो, टाटाची सर्वात स्वस्त कार, पूर्वी ₹४.९९ लाख एक्स-शोरूम होती. जीएसटी कपातीमुळे २८% वरून १८% झाली असून, आता ती खूपच स्वस्त दरात उपलब्ध होणार आहे.

Dhanshri Shintre

  • जीएसटी कपातीमुळे टाटा टियागोवर ४२,००० ते ७५,३९० रुपयांपर्यंत बचत.

  • XZA NRG CNG ऑटोमॅटिक मॉडेलवर सर्वात मोठा फायदा.

  • सणासुदीच्या हंगामात बजेट-फ्रेंडली आणि आकर्षक हॅचबॅक.

  • नवीन किमतींमुळे टियागोची मागणी वाढण्याची अपेक्षा.

टाटा मोटर्सने आपल्या ग्राहकांसाठी सणासुदीच्या हंगामात आनंदाची बातमी दिली आहे. सरकारने २२ सप्टेंबर २०२५ पासून लागू केलेल्या जीएसटी(GST) दर कपातीचा थेट फायदा आता कार खरेदीदारांना मिळणार आहे. लहान वाहनांवरील जीएसटी २८% वरून १८% करण्यात आली असून, मोठ्या वाहनांवर ४०% कर आकारला जाईल.

या बदलाचा सर्वात मोठा परिणाम टाटा मोटर्सच्या लोकप्रिय हॅचबॅक टाटा टियागोवर दिसून येत आहे. नवीन कर दरांमुळे टाटा कारवर ४२,००० ते १.५२ लाख रुपयांची बचत होऊ शकते. विशेषतः टाटा टियागोच्या XZA NRG CNG-ऑटोमॅटिक प्रकाराच्या खरेदीदारांना सर्वात मोठा फायदा मिळणार असून, या मॉडेलच्या किमतीत ७५,३९० रुपयांपर्यंत कपात होऊ शकते.

बहुतेक टियागो प्रकारांच्या किमती सुमारे ८.५% ने कमी होतील अशी माहिती मिळते. टाटा टियागो ही भारतीय बाजारपेठेत बजेट-फ्रेंडली आणि वैशिष्ट्यांनी समृद्ध हॅचबॅक म्हणून ओळखली जाते. आता कमी झालेल्या किमतींमुळे ही कार आणखी आकर्षक बनली आहे.

ही किंमत कपात विशेषतः अशा ग्राहकांसाठी लाभदायक ठरणार आहे जे परवडणारी आणि सुरक्षित कार शोधत आहेत. सणासुदीच्या हंगामाआधी टाटा मोटर्सची ही घोषणा विक्रीला चालना देईल, आणि नवीन स्वस्त किमतींमुळे टियागोची मागणी वाढेल, असे उद्योग विश्लेषकांचे अनुमान आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

OBC/Maratha Reservation: हैदराबाद गॅझेट GR विरोधात ओबीसी कोर्टात; मराठा आरक्षणाला आव्हान

Bus Accident: भीषण अपघात! भरधाव बसची टँकरला धडक, ५० फूट खोल दरीत बस पलटली, अनेकजण वाहनाखाली दबले

Prime Minister Narendra Modi: पंतप्रधान मोदींकडून सरसंघचालकांचं कौतुक; ७५ व्या वाढदिवसामिनित्त दिल्या शुभेच्छा

Fact Check : महिलांसाठी स्वतंत्र दारू दुकान? सरकारकडून महिलांना पिण्याची स्पेशल सोय?

मराठा विद्यार्थ्यांना SEBC चा फटका? MPSC निकालात कट ऑफ वाढला

SCROLL FOR NEXT