Tata Punch saam Tv
बिझनेस

Tata Punch EV: एकदाचं करा चार्ज अन् गाठा ३०० किमीचा पल्ला; जाणून घ्या टाटा पंच कारचे डिझाइन आणि फिचर्स

Tata Punch EV : नव्या Nexon EV सारख्या वैशिष्ट्यांसह टाटा पंच EV कार लॉन्च केली जाणार आहे. या कारचे मॉडेल दोन प्रकारात मीडियम रेन्ज (MR) आणि लॉन्ग रेन्ज (LR) बाजारात येण्यात येणार आहेत.

Bharat Jadhav

Tata Punch EV Car :

टाटा पंच ईव्हीची कार लवकरच लॉन्च केली जाणार आहे. कंपनीने अद्याप लॉन्चची तारीख जाहीर केलेली नाही. परंतु ही इलेक्ट्रिक मायक्रो एसयूव्ही टेस्टदरम्यान अनेक वेळा पाहिली गेली. इलेक्ट्रिक कारचे टेस्टिंग मॉडेल्स पाहून त्याची अनेक वैशिष्ट्ये समोर आली आहेत. नुकत्याच स्पॉट केलेले मॉडेल अनेक EV-विशिष्ट कॉस्मेटिक बदल करण्यात आल्याचं दिसले. यामुळे ही ईवी कार नियमित कारपेक्षा वेगळी असेल असा अंदाज वर्तवला जात आहे. (Latest News)

डिझाइन

यात विशेष फ्रंट बंपर-माउंट चार्जिंग पोर्ट आहे, जे लक्ष वेधून घेण्यास यशस्वी होत आहे. पंच EVच्या पुढच्या ग्रिलमध्ये काही किरकोळ बदल दिसणार आहेत. ज्यात हुडवर पूर्ण रुंद एलईडी डीआरएल देण्यात आले आहे. हेडलॅम्प आणि फॉग असेंब्ली आधीच्या मॉडेलप्रमाणेच ठेवले आहे. तर इलेक्ट्रिक मॉडेलमध्ये नेहमीच्या मॉडेलच्या तुलनेत खास डिझाइन केलेले अलॉय व्हील्स देण्यात आले आहेत.

काय आहे वैशिष्ट्ये

या कारला इंटीग्रेटेड कॅमेरासह ORVM आणि ३६०-डिग्री सराउंड कॅमेरा प्रणाली देण्यात आलीय. या अतिरिक्त डिझाइन हायलाइट्समध्ये छतावरील रेल, शार्क-फिन अँटेना, उच्च-माऊंट स्टॉप लॅम्प आणि मागील वायपर देण्यात आले आहे, या गोष्टींमुळे या कारची आकर्षकता आणि कार्य क्षमता दोन्ही वाढते. दरम्यान कारच्या पार्ट कसे असतील याची माहिती अद्याप समोर आली नाहीये. परंतु Tata Punch EV मध्ये स्मार्टफोन कनेक्टिव्हिटीसह नवीन आणि मोठी १०.२५ इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम मिळू शकते.

इलेक्ट्रिक सनरूफचा समावेश केल्याने पंच EV ही सुविधा देणारी भारतातील सर्वात परवडणारी इलेक्ट्रिक कार बनणार आहे. कारच्या टॉप ट्रिम्समध्ये नवीन टू-स्पोक स्टीयरिंग व्हील, गोलाकारात असलेला डिस्प्ले-इंटिग्रेटेड गियर सिलेक्टर डायल, मागील डिस्क ब्रेक आणि इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक कारला देण्यात आली आहेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अपडेट Nexon EV सारखी असणारी टाटा पंच EVचे मॉडेल मीडियम रेन्ज (MR) आणि लॉन्ग रेन्ज श्रेणी (LR) मध्ये येणार आहेत. पॉवरट्रेनबाबत अधिकृत तपशील अद्याप समोर आलेला नसला तरी कारमध्ये टाटाच्या झिपट्रॉन तंत्रज्ञानाचा समावेश असण्याची शक्यता आहे. ग्राहकांना ही कार दोन बॅटरी पॅक पर्यायांमध्ये मिळू शकते. जे एकदा पूर्णपणे चार्ज केल्यानंतर अंदाजे २०० किमी ते ३०० किमीपर्यंतचा पल्ला गाठता येणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video: अबब! जेवणाचा थाट पाहून डोळे विस्फारतील, दक्षिण भारतातील व्हिडीओ व्हायरल

Maharashtra News Live Updates : कोल्हापुरात आतापर्यंत २० कोटींचा मुद्देमाल जप्त, 24 हजार संशयितांवर कारवाई

Pune Politics: शरद पवारांचा मास्टर स्ट्रोक, मतदानापूर्वी पुण्यातील टिंगरे, तुपे आणि धनकवडेंच्या हाती 'तुतारी'

Personality Test: पहिली मुलगी दिसली की कवटी? तुमचं उत्तर उलगडणार तुमच्या पर्सनॅलिटीचं रहस्य

Railway Jobs: १०वी, १२ वी पास तरुणांना रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी; अर्ज कसा करावा? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT