मध्यमवर्गीयांसाठी घर घेण्यासाठी गृहकर्ज हाच एक पर्याय असतो. होम लोनच्या मदतीने सामान्य माणूस घर घेण्याचे स्वप्न पूर्ण करतो. कर्ज घेतल्यानंतर त्याची परतफेड देखील वेळेवर करावी लागते. बँका हे कर्ज मासिक ईएमआयमधून वसूल करतात. परंतु योग्य नियोजन नसल्यास कर्जावर किती व्याज देतोय याची माहिती राहत नाही. अनेकजण कर्ज घेताना ते किती कर्ज घेत आहेत. त्या बदल्यात त्यांना किती व्याज द्यावे लागले. याचा हिशोब ठेवत नाहीत. यामुळे फायद्यापेक्षा नुकसान जास्त होते. (Latest News)
होम लोन घेणं फायद्याचं कसं करायचं आणि ते कर्ज कसं लवकर संपवायचं याची एक ट्रीक आम्ही तुम्हाला आज सांगत आहोत. जर तुम्ही २० वर्षांसाठी ४० लाख रुपयांचे कर्ज घेतलं, तर तुमचा मासिक ईएमआय ९.५५ टक्के व्याजदराने ३७,४१६ रुपये इतका येतो. हा हप्ता तुम्हाला २० वर्षे सतत भरावा लागेल, तेही इतके व्याजदर असेल तर.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
जर व्याजदर वाढल्यास तुमचा ईएमआय किंवा तुमच्या कर्जाचा कालावधी वाढू शकतो. ९.५५ टक्क्यानुसार आपण हिशोब केल्यास ४९,७९,८२७ रुपये म्हणजेच सुमारे ५० लाख रुपये कर्जाच्या रकमेवर व्याज म्हणून भरावे लागते. मूळ रकमेसह, तुम्हाला एकूण ८९,७९ ८२७ रुपये द्यावे लागतात. म्हणजेच तुम्ही जे कर्ज घेतात त्याच्या दुप्पट रक्कम भरावी लागते.
जर २५ वर्षांसाठी ४०,००,००० रुपये कर्ज घेतल्यास, EMI कमी होईल, परंतु व्याज वाढेल. अशा स्थितीत, तुम्हाला ९.५५ टक्के व्याज दराने ३५,०८७ रुपये मासिक हप्ता भरावा लागेल. म्हणजेच जवळपास तुम्हाला ६५,२६,०९८ रुपये व्याज म्हणून भरावे लागेल. ४० लाखांच्या कर्जासाठी मूळ रकमेसह १,०५, २६, ०९८ 098 रुपये भरावे लागेल
व्याजाचे ओझे कसे कमी करणार?
व्याजाचे हे ओझे कमी करायचे असेल तर प्रथम बँकेकडून किमान कर्ज घेण्याचा प्रयत्न करा. कर्जाची रक्कम एवढीच ठेवा की तुम्ही ती कमी कालावधीत परत करू शकाल. ईएमआय कमी कालावधीत ठेवल्यास, ईएमआय मोठा होऊ शकतो, परंतु बँकेला जास्त व्याज द्यावे लागणार नाही. त्याचबरोबर कर्ज लवकर परत फेड करण्याचा प्रयत्न करा.
प्रीपेमेंट पद्धतीमुळे कर्जाची लवकर परतफेड करण्यास मदत होते. यामुळे तुमचे व्याजात जाणारे लाखो रुपये वाचू शकतील. प्री-पेमेंटची रक्कम तुमच्या मूळ रकमेतून वजा केली जाते. यामुळे तुमची मुख्य शिल्लक कमी होते. हे करण्याचा उत्तम मार्ग म्हणजे जेव्हाही तुम्हाला कुठूनही पैसे जमा होतात, तेव्हा तुम्ही ते गृहकर्ज खात्यात जमा करत रहा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.