तुम्हाला पैशाची नितांत गरज आहे आणि तुमच्या खात्यात झिरो बँलन्स असेल तर घाबरून जाण्याची गरज नाही. तुम्हाला तुमच्या बँक खात्यातून १० हजार रुपये काढता येणार आहेत. फक्त तुमच्याकडे जनधन खाते असणे आवश्यक आहे. केंद्र सरकारने २०१७ मध्ये जनधन खाते सुरू केले होते. पंतप्रधान जनधन योजनेअंतर्गत बँक खाते उघडल्यानंतर चेकबूक, पासबूक , अपघाती विमा यासारख्या अनेक सुविधा उपलब्ध आहेत. याचसोबतच ग्राहकांना ओव्हरड्राफ्टची सुविधाही मिळते. त्याच्या मदतीने, तुमच्या बँक खात्यात झिरो बँलन्स असतानाही गरज असेल तेव्हा तुम्हाला पैसे काढता येऊ शकतात.
पंतप्रधान जनधन योजनेअंतर्गत झिरो बँलन्स खाती उघडली जातात. खात्यात किमान रक्कम शिल्लक नसली तरी त्यासाठी तुम्हाला कोणतही शुल्क द्यावे लागणार नाही. जनधन योजनेत विम्यासारख्या अनेक प्रारच्या सुविधा देण्यात आल्या आहेत. झिरो बँलन्सवर चालणाऱ्या या खात्यामुळे कोट्यवधी लोकांनी बचत खाते, विमा आणि पेन्शन सारखे फायदे सहज मिळण्यास मदत झाली आहे.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
जनधन योजनेअंतर्गत तुमच्या खात्यात रक्कम शिल्लक नसतानाही १० हजार रुपयांपर्यंत ओव्हरड्राफ्ट सुविधा मिळेल. ही सुविधा अल्प मुदतीसारखी आहे. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी जनधन खाते किमान ६ महिने जुने असावे, मात्र खाते नवीन असले तरी २ हजार रुपयांपर्यंतचा ओव्हरड्राफ्ट उपलब्ध आहे. मात्र या खात्यातील सुविधेसाठी किमान वयोमर्यादा ६५ वर्षे ठेवण्यात आली
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.