UPI Transaction द्वारे चुकीच्या अकाऊंटला पैसे गेल्यास टेन्शन घेऊ नका, 4 तासात पैसे परत मिळणार?

Digital Fraud : Gpay, Phonepe आणि PayTM द्वारे हल्ली आर्थिक फसवणुकीची वाढती प्रकरणे समोर येत आहे. यामुळे अनेकांना लाखो रुपयांचा आर्थिक फसवणूकीला सामोरे जावे लागते.
UPI Transaction
UPI TransactionSaam tv
Published On

UPI Transaction Payment :

डिजिटलायझेशनच्या युगात बहुतेक लोक रोख रकमेऐवजी यूपीआयद्वारे पैसे देण्याला पसंत करतात. जर तुम्ही देखील यूपीआयद्वारे पेमेंट करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी फायदेशीर ठरु शकते.

Gpay, Phonepe आणि PayTM द्वारे हल्ली आर्थिक फसवणुकीची वाढती प्रकरणे समोर येत आहे. यामुळे अनेकांना लाखो रुपयांचा आर्थिक फसवणूकीला सामोरे जावे लागते. परंतु, अशातच डिजिटल पेमेंटवर चार तासांच्या आत व्यवहार पूर्ववत करण्यासाठी सरकार सुरक्षा उपाय लागू करणार आहेत. या अंतर्गत पहिल्यांदाच IMPS, RTGS आणि UPI सह २००० रुपयांपेक्षा जास्त डिजिटल व्यवहारांसाठी ४ तासांची मर्यादा लागू केली जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

याबाबतची माहिती इंडियन एक्सप्रेसने एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याच्या अहवालात सांगितले की, पहिल्यांदाच आम्ही २००० रुपयांच्या वरच्या डिजिटल (Digital) व्यवहारांसाठी चार तासांची मुदत जोडण्याचा विचार करत आहोत. याबाबत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियासोबत मंगळवारी झालेल्या बैठकीत या मुद्यावर चर्चा करण्यात आली. यामध्ये खाजगी क्षेत्रातील बँका आणि Google आणि Razorpay सारख्या तंत्रज्ञान कंपन्यांचा समावेश असेल.

UPI Transaction
Gold Silver Rate (29th November): ऐन लग्नसराईत ग्राहकांना झटका! सोन्याचा भाव ६३ हजार पार, वाचा आजचे दर

अधिकाऱ्यांनी असे सांगितले की, पहिल्यांदा एखाद्याला पेमेंट केल्यावर तुमच्याकडे पेमेंट रिव्हर्स करण्यासाठी किंवा बदलण्यासाठी चार तास असतील. हे NEFT (नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर)च्या अंतर्गत केले जाईल. परंतु, याबाबतचे ट्राजेंक्शन हे काही तासांमध्येच करता येईल.

त्यांनी सांगितले की, सुरुवातीला आम्हाला कोणत्याही रकमेची मर्यादा नको होती. परंतु, अनेक औद्योगिक क्षेत्रातील व्यापारी वर्गाशी चर्चा करुन लक्षात आले की, किराणा सामान आणि छोट्या खरेदीवर परिणाम होऊ शकतो. त्यासाठी आम्ही २००० रुपयांपेक्षा कमी रक्कम (Price) ठेवत आहोत. यामध्ये सूट देण्याचीही योजना आम्ही आखत आहोत.

तसेच नवीन युजर्सने UPI खाते उघडल्यानंतर पहिल्या २४ तासांत ५००० रुपये पाठवू शकतात. जर तुमचे NEFT सक्रिय झाल्यास पहिल्या २४ तासांत जास्तीत जास्त ५० हजार रुपये ट्रान्सफर करता येतील.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com