Tata Sierra google
बिझनेस

Tata Sierra Booking Date: टाटाच्या नव्या SUV मॉडेलची किंमत आली समोर, बुकिंग डेट झाली फिक्स, वाचा फिचर्स

Tata Sierra Delivery Date: नवीन टाटा सिएरा एसयूव्ही सात व्हेरिएंट्समध्ये लॉन्च झाली असून ११.४९ लाखांपासून किंमत आहे. बुकिंग, डिलिव्हरी तारीख, इंजिन पर्याय आणि प्रीमियम फिचर्स जाणून घ्या.

Sakshi Sunil Jadhav

टाटा मोटर्सने तब्बत दोन दशकांनंतर बाजारात पुन्हा एन्ट्री केली आहे. टाटा मोटर्सची लोकप्रिय नवीन टाटा सिएरा कारची किंमत आणि बूक करण्याची पद्धत या सगळ्याची यादी जाहीर केली आहे. याआधी कंपनीकडून फक्त सुरुवातीची किंमत, निवडक मध्यम प्रकारांच्या गाड्यांच्या किंमत जाहीर करण्यात आल्या होत्या. मात्र आता रेंज-टॉपिंग व्हेरिएंट्ससह सर्व प्रकारांच्या किंमती समोर आल्या आहेत.

नव्या टाटा सिएराची एक्स-शोरूम किंमत ११.४९ लाख रुपयांपासून सुरू होऊन २१.२९ लाख रुपयांपर्यंत जाते. एकूण सात प्रकारांमध्ये ही एसयूव्ही असणार आहे. त्यामध्ये स्मार्ट प्लस, प्युअर, प्युअर प्लस, अॅडव्हेंचर, अॅडव्हेंचर प्लस, , Accomplished, आणि Accomplished प्लस या व्हेरिएंट्सचा समावेश असणार आहे.

बूक करण्याच्या तारखा अन् कलर्स

इच्छुक ग्राहक १६ डिसेंबर २०२५ पासून ऑनलाइन किंवा जवळच्या टाटा डीलरशिपवर सिएरा बुक करू शकतात, तर १५ जानेवारी २०२६ पासून कार डिलिव्हरी सुरू होणार आहे. रंगांच्या बाबतीतही टाटा मोटर्सने ग्राहकांना आकर्षक पर्याय दिले आहेत. सिएरा बंगाल रूज, अंदमान अॅडव्हेंचर, कूर्ग क्लाउड्स, मुन्नार मिस्ट, मिंटल ग्रे आणि प्रिस्टाइन व्हाइट अशा सहा रंगांमध्ये उपलब्ध आहे.

गाडीची डिझाइन

डिझाइनच्या दृष्टीने नवीन सिएरा आधुनिक आणि रेट्रो एलिमेंट्सचे सुंदर मिश्रण सादर करते. समोर कनेक्टेड एलईडी लाईट बार, टेक्सचर्ड ग्रिल, खाली बसवलेले मुख्य एलईडी हेडलॅम्प आणि उभ्या स्टॅक केलेले फॉग लॅम्प्स यामुळे एसयूव्हीला दमदार लूक मिळतो. बाजूंनी पाहिल्यास, सिएराची सिग्नेचर अल्पाइन विंडो डिझाइन कायम ठेवण्यात आली असून ब्लॅक बी-पिलर, कॉन्ट्रास्टिंग ब्लॅक रूफ आणि गडद सी-पिलरमुळे फ्लोटिंग रूफ इफेक्ट तयार होतो. मागे कनेक्टेड टेललाइट्स आणि बॉक्सी डिझाइनमुळे एसयूव्हीचा मजबूत स्टान्स ठळकपणे दिसतो.

गाडीतील फिचर्स

नव्या फोर-स्पोक स्टीअरिंग व्हीलवर प्रकाशित टाटा लोगो आहे. फीचर्समध्ये 5G कनेक्टिव्हिटीसह आयरा कनेक्टेड कार टेक, ओटीए अपडेट्स, पॅनोरॅमिक सनरूफ, ड्युअल-झोन क्लायमेट कंट्रोल, 360-डिग्री कॅमेरा, डॉल्बी अॅटमॉससह जेबीएल साउंड सिस्टम, लेव्हल-2 ADAS आणि सहा एअरबॅग्ज यांचा समावेश आहे. सिएरा १.५-लिटर टर्बो डिझेल, १.५-लिटर एनए पेट्रोल आणि १.५-लिटर हायपरियन टर्बो पेट्रोल अशा तीन इंजिन पर्यायांमध्ये उपलब्ध आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: १० दिवसांत भाजपला सोडचिठ्ठी, माजी आमदार नितीन भोसले यांनी केला शिवसेनेमध्ये प्रवेश

BMC Election : आयोगाचा भाजपला जोरदार धक्का, ऐन निवडणुकीत परवानगी नाकारली

Ladki Bahin Yojana: लाडकीच्या खात्यात ₹३००० ऐवजी ₹१५०० आले, आता डिसेंबरचा हप्ता का रखडला? महत्त्वाची माहिती समोर

Tilgul Poli Recipe : मकर संक्रांतीला फक्त १० मिनिटांत बनवा मऊसूत 'तीळ गुळाची पोळी', वाचा पारंपरिक रेसिपी

Shubh Shravani Serial : "प्रेम असावं तर असं असावं!"; 'शुभ श्रावणी' मालिकेची रिलीज डेट जाहीर, पाहा खास VIDEO

SCROLL FOR NEXT