Tata Motors EVs  Saam tv
बिझनेस

Tata Motors EVs : टाटा मोटर्सची यशस्वी झेप! 1 लाख इलेक्ट्रिक वाहनांची केली विक्री

Tata Motors Sell 1 lakhs Electric cars : देशात ईव्ही क्रांतीचा पाया घालणाऱ्या कंपनीने १ लाख टाटा ईव्हींचा मोठा टप्पा पार केल्याची घोषणा आज कंपनीतर्फे केली.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

1 Lakh Tata EVs & Beyond : टाटा मोटर्स या भारतातील आघाडीच्या वाहन उत्पादक तसेच देशात ईव्ही क्रांतीचा पाया घालणाऱ्या कंपनीने १ लाख टाटा ईव्हींचा मोठा टप्पा पार केल्याची घोषणा आज कंपनीतर्फे केली. सकारात्मक बदलाला चालना देण्याप्रती आणि भारताच्या शाश्वत भवितव्यात योगदान देण्याप्रती टाटा मोटर्सची अविचल बांधिलकी या महत्त्वपूर्ण प्रवासातून दिसून येते.

गेल्या तीन वर्षांत टाटा मोटर्सने भारतातील ईव्ही क्रांतीचे नेतृत्व करून एक असामान्य प्रवास केला आहे. पहिल्या १० हजार इलेक्ट्रिक वाहनांपासून ते १ लाख इलेक्ट्रिक वाहनांपर्यंतचा प्रवास टाटा मोटर्सने वेगाने पूर्ण केला आहे, ५० हजार ते १ लाख हा टप्पा तर केवळ ९ महिन्यांत पूर्ण झाला. हे यश साजरे करण्यासाठी टाटा मोटर्सने नेत्रदीपक ड्रोन शोद्वारे आकाश उजळून टाकले. स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्याचा प्रवास या रोषणाईतून दाखवण्यात आला.

टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटी लिमिटेड आणि टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेइकल्स लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक श्री. शैलेश चंद्रा या विशेष प्रसंगी म्हणाले, आजचा दिवस आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे, कारण, आम्ही १ लाख टाटा ईव्हींचा महत्त्वाचा टप्पा पार केला आहे. हा टप्पा आम्हाला खूप समाधान देणारा आहे.

कारण, इलेक्ट्रिफिकेशनच्या क्षेत्रात आम्ही टाकलेल्या धाडसी पावलामुळे या तंत्रज्ञानाला स्वीकृती मिळवून देण्यात मदत झाली. हे तंत्रज्ञानच भारताला शून्य कार्बन उत्सर्जनाकडे घेऊन जात आहे. आमचे ईव्ही ग्राहक, सरकार, आमचे गुंतवणूकदार, टाटा युनिव्हर्स (uniEVerse) परिसंस्थेतील कंपन्या यांनी दिलेल्या निरंतर पाठिंब्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. आपण सगळे मिळून भारताला पर्यावरणपूरक वाहतुकीच्या दिशेने घेऊन जात आहोत."

या टप्प्यामुळे इलेक्ट्रिफिकेशनच्या वाढीसाठी पार्श्वभूमी तयार झाली आहे. यातून वेगाने वाढणारी एक परिसंस्था दिसून येत आहे. त्यामुळे ग्राहक (Users), पुरवठादार, चार्जिंग संरचना कंपन्या व गुंतवणूकदारांना नवीन तंत्रज्ञान उपयोगात आणण्याचा तसेच उद्योगक्षेत्रात नवीन क्षमता विकसित करण्याचा आत्मविश्वास (Confidence) मिळणार आहे.

अशा वेगवान वाढीमुळे नवीन तंत्रज्ञानातील मनुष्यबळाच्या सर्व प्रवर्गांमध्ये लक्षणीय प्रमाणात रोजगार निर्माण होणार आहेत, तेल आयात कमी होणार आहे आणि भारत हे ईव्ही व ईव्हींशी निगडित सुट्या भागांचे उत्पादन करणारे महत्त्वाचे केंद्र होणार आहे. भारताच्या (India) वाहन उद्योगातील अमाप संभाव्यता उपयोगात आणत असतानाच, या प्रवासाचा भाग होणे आमच्यासाठी खास अनुभव आहे आणि असे अनेक महत्त्‍वपूर्ण टप्पे पार करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.

वाहतुकीच्या भवितव्याला आकार देताना टाटा ईव्हींनी १.४ अब्ज किलोमीटर्सचे अंतर कापले आहे. कार्बन उत्सर्जन व प्रदूषण कमी करण्याची ग्वाही देणाऱ्या या नवीन युगात, ग्राहकांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे कार्बन उत्सर्जनात लक्षणीय म्हणजेच अर्थात २,१९,४३२ टनांनी घट झाली आहे. यामुळे पर्यावरणावर नक्कीच सकारात्मक परिणाम झाला आहे. आर्थिक दृष्टीकोनातून बघायचे तर टाटा ईव्ही वापरणाऱ्यांनी इलेक्ट्रिक वाहनांचा वापर सुरु केल्यापासून एकत्रितपणे इंधनापोटी खर्च होणारे ७ अब्ज रुपये वाचवले आहेत. या भरीव बचतीमुळे तंत्रज्ञानाच्या किफायतशीर व शाश्वत स्वरूपावर शिक्कामोर्तब झाले आहे.

'गो बियॉण्ड' अर्थात पुढे जात राहण्यासाठी टाटा मोटर्सने यापूर्वीच ३ टप्प्यांचे ईव्ही धोरण जाहीर केले आहे. ग्राहकांच्या बदलत जाणाऱ्या आवश्यकता पूर्ण करण्यासाठी, वेगवेगळ्या शैलीतील वाहने अनेक परवडण्याजोग्या दरबिंदूंना उपलब्ध करून देण्याची, कंपनीची योजना आहे.

कंपनीने याआधीच ऑटो एक्स्पो २०२३ मध्ये कर्व्ह, हॅरियर ईव्ही, सिएरा ईव्ही आणि अविन्या या भविष्यकाळातील संकल्पना सर्वांपुढे आणल्या आहेत. ही महत्त्वाकांक्षी ईव्ही भारतातील ग्राहकांचे नवीन विभाग खुले करणार आहेत. चार्जिंगच्या पायाभूत सुविधाही देशाच्या कानाकोपऱ्यात सुरू होणार आहेत.

त्यामुळे कक्षेची चिंता न करता वाहतूक अखंडित सुरू राहू शकेल. ईव्हींची ठोस पुरवठा परिसंस्था तयार करण्यासाठी आणखी गुंतवणूक अपेक्षित आहे. देशातील विद्युतीकरण सुधारण्याप्रती आणि भारतीय ग्राहकांना कामगिरी व खात्रीशीरता याबाबत तडजोड न करता शाश्वत पर्याय निवडण्याची क्षमता देण्याप्रती कंपनी समर्पित आहे.

#1LakhTataEVs&Beyond हा हॅशटॅग वापरून आमच्या सोबत सहभागी व्हा व हे खास क्षण साजरे करा. टाटा ईव्ही, ऑफर्स व कार खरेदीच्या पर्यायांबाबत अधिक जाणून घेण्यासाठी तुमच्या नजीकच्या डीलरशिपला भेट द्या किंवा https://ev.tatamotors.com/ या वेबसाइटला भेट द्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! विजयाच्या मेळाव्यानंतर राजकीय घडामोडींना वेग; ठाकरे गटाकडून भाजपच्या मोठ्या नेत्याला ऑफर

IND vs ENG 2nd Test Score: शुबमनकडून इंग्लंडच्या गोलंदाजांची धुलाई; दुसऱ्या डावातही ठोकलं शतक

India Bangladesh Tour: टीम इंडियाचा बांगलादेश दौरा का झाला रद्द? काय आहे कारण,जाणून घ्या

Shaktipeeth Expressway :'शक्तीपीठ' ठरणार पांढराहत्ती? शेतकऱ्यांचं नुकसान, शेकडो गावांना फटका बसणार; राजू शेट्टींनी सांगितले विकासाचे अडथळे

Satara News: थरारक! साताऱ्यातील खंबाटकी घाटात ट्रकचा जळून कोळसा; वाहतूक ठप्प, VIDEO

SCROLL FOR NEXT