Tata Motors Saam Tv
बिझनेस

Tata Motors: टाटा मोटर्सकडून आपल्‍या इलेक्ट्रिक ऑफरिंगमध्‍ये वाढ; नवीन टाटा एस ईव्‍ही १००० लाँच

Tata Motor Launch 1000 Tata Ace EV: टाटा मोटर्स ही भारतातील सर्वात मोठी वाहन उत्पादक कंपनी आहे. कंपनीने काल नवीन एस ईव्‍ही १०००च्‍या लाँच केल्या आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

टाटा मोटर्स ही भारतातील सर्वात मोठी वाहन उत्पादक कंपनी आहे. कंपनीने काल नवीन एस ईव्‍ही १०००च्‍या लाँच केल्या आहेत. त्यामुळे कंपनीचे ई-कार्गो गतीशीलता सोल्‍यूशन्‍सन प्रबळ झाले आहे. लास्‍ट-माइल गतीशीलतेमध्‍ये क्रांतिकारी बदल घडवून आणण्‍यासाठी विकसित करण्‍यात आलेला हा शून्‍य-उत्‍सर्जन मिनी-ट्रक लाँच केला आहे. हा ट्रक १ टनचे उच्‍च प्रमाणित पेलोड आणि एका चार्जमध्‍ये १६१ किमीची प्रमाणित रेंज देतो. एस ईव्ही नवीन व्‍हेरिएंट एफएमसीजी, बेव्‍हरेजेस्, पेंट्स अँड ल्‍युब्रिकण्‍ट्स, एलपीजी आणि डेअरी अशा विविध क्षेत्रांमधील सर्वसमावेशक गरजांची पूर्तता करेल.

देशभरातील १५० हून अधिक इलेक्ट्रिक व्हेईकल कल सपोर्ट सेंटर्सचे पाठबळ असलेल्‍या एस ईव्‍हीमध्‍ये प्रगत बॅटरी मॅनेजमेंट सिस्‍टम, फ्लीट एज टेलिमॅटिक्‍स सिस्‍टम आणि दर्जात्‍मक अपटाइमसाठी प्रबळ अॅग्रीगेट्स आहेत. एस ईव्‍ही टाटा युनिईव्‍हर्सच्‍या व्‍यापक क्षमतांचा लाभ घेते, संबंधित टाटा ग्रुप कंपनीजसोबत सहयोग करण्‍यासोबत ग्राहकांना सर्वांगीण ई-कार्गो गतीशीलता सोल्‍यूशन देण्‍यासाठी देशातील आघाडीच्‍या फायनान्शियर्ससोबत सहयोग करते. ही वेईकल वैविध्‍यपूर्ण कार्गो डेक्‍ससह उपलब्‍ध असेल आणि देशभरातील सर्व टाटा मोटर्स व्‍यावसायिक वाहन डिलरशिप्‍समध्‍ये विक्री करण्‍यात येईल.

या घोषणेबाबत मत व्‍यक्‍त करत टाटा मोटर्स कमर्शियल वेईकल्‍सच्‍या एससीव्‍हीअँडपीयूचे उपाध्‍यक्ष व व्‍यवसाय प्रमुख श्री. विनय पाठक म्‍हणाले, ''गेल्‍या दोन वर्षांमध्‍ये आमच्‍या एस ईव्‍ही ग्राहकांना अद्वितीय अनुभवाचा फायदा झाला आहे, जे लाभदायी व शाश्‍वत आहे. ते क्रांतिकारी शून्‍य-उत्‍सर्जन लास्‍ट-माइल गतीशीलता सोल्‍यूशनचे अॅम्‍बेसेडर्स बनले आहेत. एस ईव्‍ही १००० च्‍या लाँचसह आम्‍ही ग्राहकांना अद्वितीय अनुभव देत आहोत, जे सेवा देत असलेल्‍या विविध क्षेत्रांमध्‍ये अधिक कार्यसंचालन उत्‍पन्‍न मिळवून देणाऱ्या सोल्‍यूशन्‍सचा शोध घेत आहेत. आम्‍हाला विश्‍वास आहे की एस ईव्‍ही १००० हरित भविष्‍याप्रती योगदान देईल, तसेच उच्‍च दर्जाचे मूल्‍य आणि मालकीहक्‍काचा कमी खर्च देईल.''

एस ईव्‍हीमध्‍ये ईवोजेन पॉवरट्रेनची शक्‍ती आहे, जी ७ वर्षांची बॅटरी वॉरंटी आणि ५-वर्ष सर्वसमावेशक मेन्‍टेनन्‍स पॅकेजसह उत्तम ड्रायव्हिंग अनुभव देते. या वेईकलमध्‍ये सुरक्षित, सर्व वातावरणामध्‍ये अनुकूल कार्यसंचालनासह ड्रायव्हिंग रेंज वाढवण्‍यासाठी प्रगत बॅटरी कूलिंग सिस्‍टम व रिजनरेटिव्‍ह ब्रेकिंग सिस्‍टम आहे. तसेच या वेईकलमध्‍ये उच्‍च अपटाइमसाठी नियमित व जलद चार्जिंग क्षमता आहेत.

Dahihandi 2025 : दहीहंडीमध्ये २ गोविंदाचा मृत्यू; ९५ जण जखमी, कोणत्या हॉस्पिटलमध्ये किती जण अॅडमिट, जाणून घ्या

Mumbai Lake Water Level : मुंबईकरांसाठी खूशखबर! तुळशी तलाव ओव्हरफ्लो, ७ तलावात किती पाणीपुरवठा?

Konkan Railway: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; रेल्वेनं घेतला मोठा निर्णय

Ajit Pawar Rohit Pawar : अजित पवार विरूद्ध रोहित पवार, दादांचा पुतण्याला दम

Mumbai Dahi Handi 2025 : मुंबईत दहीहंडी उत्सवाला गालबोट; आणखी एका गोविंदाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT