Tata Curvv EV Saam Tv
बिझनेस

आकर्षक लूक अन् जबरदस्त फीचर्ससह Tata Curvv EV लाँच ; १० मिनिटांत होणार बॅटरी चार्ज;किंमत किती?

Tata Curvv EV Price: टाटा कंपनीची बहुप्रतिक्षित एसयूव्ही Tata Curvv EV बाजारात लाँच झाली आहे. ही कार आकर्षक लूक आणि जबरदस्त फीचर्ससह बाजारात उपलब्ध आहे.

Siddhi Hande

टाटा ही देशातील ऑटोमोबाईल क्षेत्रातील लोकप्रिय कंपनी आहे. कंपनीने आपली बहुप्रतिक्षित कुपे स्टाईल एसयूव्ही Tata Curvv EV लाँच केली आहे. ही कार आता बाजारात विक्रीसाठी सज्ज झाली आहे. आकर्षक लूक आणि दमदार इंजिनसह ही कार आता तुम्ही खरेदी करु शकतात. या कारची सुरुवातीची किंमत १७.४९ लाख रुपये आहे.

Tata Curvv EV ला कंपनीने वेगवेगळे बॅटरी पॅक दिले आहे. यात 55Kwh आणि 45kWh बॅटरी पॅक देण्यात आहे. कंपनीच्या या कारचा बॅटरी फास्ट चार्जिंगचा पर्याय देते. कंपनीचा दावा आहे की, 1.2c चर्जिंग तंत्रज्ञानाच्या मदतीने तब्बल १५ मिनिटांत कारची बॅटरी चार्ज होते. ही कार तुम्हाला १५० किमी रेंज देईल. या कारची बॅटरी 70kW चार्जरने चार् केल्यावर ४० मिनिटांत ८० टक्के होते. फुल चार्ज झाल्यावर कार ५८५ किमी ड्रायव्हिंग रेंज देते.Curvv EV कार अॅडव्हान्स फिचर्ससहित लाँच झाली आहे. कारमध्ये

123kW क्षमतेचे लिक्विड कूल्ड पर्मानेंट पॉवरफुल इलेक्ट्रिक मोटरचा वापर केला आहे.कंपनीच ही कार ८.६ सेकंडमध्ये ० ते १०० किमी/प्रति तास धावते.

या कारमध्ये व्हेईकल टू व्हेईकल आणि व्हेईकल टू लोड फंक्शन देण्यात आले आहे. V2V सिस्टीमच्या मदतीने तुम्ही एका इलेक्ट्रिक कारच्या मदतीने दुसरी इलेक्ट्रिक कार चार्ज करु शकतात.

या कारमध्ये प्रिमियम फीचर्स देण्यात आले आहेत. त्यात ६ वे अॅडजस्टेबल ड्रायव्हर सीट, प्रिमियम लैदरेट वेंटिलिटेड सीट, रिक्लाइ फंक्शन देण्यात आले आहे. त्याचसोबत सेकंड रो सीट,कस्टमाइजेशन सिस्टिमसोबत मूड लाइटिग, २६ किमीचा कॉकपीट दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

SCROLL FOR NEXT