देशातील सर्वात मोठी ऑटोमोबाइल कंपनी टाटा मोर्टसने आज आपली चौथी इलेक्ट्रिक कार Tata Punch EV बाजारात लॉन्च केली आहे. यामध्ये दोन वेगळ्या बॅटरी पॅक आणि दोन वेगळ्या ड्रायव्हिंग पॉवरट्रेनसह येणारी ही इलेक्ट्रिक SUV देशातील सर्वात सुरक्षित ईव्ही कार असल्याचा कंपनीने दावा केला आहे.
यामध्ये कंपनीने आकर्षक लूक आणि दमदार बॅटरी पॅकसह Tata Punch EV ची सुरुवातीची किंमत १०.०९ लाख रुपये आहे तर टॉप व्हेरियंटसाठी १४.९९ लाख रुपये (एक्स शोरुम)साठी आहे. जाणून घेऊया याच्या इतर फीचर्स आणि बुकिंग प्रोसेसबद्दल
Tata Punch EV चे बुकिंग (booking) सुरु झाले आहे. ग्राहक २१००० रुपयांचे टोकन देऊन कंपनीच्या अधिकृत वेबसाइट आणि अधिकृत डीलरशीपद्वारे ही इलेक्ट्रिक SUV बुक करु शकता. या ईव्हीची डिलिव्हरी २२ जानेवारी २०२४ पासून सुरु होणार आहे.
1. Tata Punch EV ची रेंज कशी असेल?
टाटा मोटर्सने ही ईव्ही (EV) आर्किटेक्चर (Acti.ev)वर विकसित केले आहे. हे नवीन आर्किटेक्चर अनेक गोष्टींनी खास आहे. यात सर्वाधिक बॅटरी पॅक असणार आणि ड्रायव्हिंग रेंजची सुविधा देण्यात आली आहे. ही SUV लाँग रेंज आणि स्टँडर्ड रेंज व्हेरियंटमध्ये ऑफर केली जाते. यामध्ये लाँग रेंज व्हेरियंटमध्ये ३ ट्रिम्स आणि स्टँटर्ड रेंज व्हेरियंटमध्ये ५ ट्रिम्स आहेत. कंपनी या एसयूव्हीसोबत ३.३ किलोवॅट वॉलबॉक्स चार्जरही देण्यात आला आहे. या SUV मध्ये सनरुफ आणि सनरुफशिवाय असे दोन पर्यायही देण्यात आले आहेत.
2. डिझाइन
Tata Punch EV चे डिझाइन ICE मॉडेलसारखे दिसते. कंपनीने त्याच्या पुढच्या भागात एंड टू एंड एलईडीचे हेडलाइट्स दिले आहेत. ही SUV खास सिग्नेचर कलरसह विविध मॉडेलमध्ये येत आहे. यात १६ इंच अलॉय व्हील देण्यात आले आहे. ज्यामुळे त्याच्या साइडचे प्रोफाइल चांगले दिसेल असे कंपनीचे मत आहे.
3. किंमत (Price)
कंपनीने दोन वेगवेगळ्या बॅटरी पॅकसह टाटा पंच ईव्ही बाजारात आणली आहे. याची 25kWh बॅटरी पॅक एका चार्जमध्ये 315 किलोमीटरपर्यंतची रेंज देते. तर दुसऱ्या एडिशनमध्ये कंपनीने 35kWh क्षमतेचा बॅटरी पॅक दिला आहे. यामध्ये कंपनी एका चार्जमध्ये ४२१ किलोमीटर पर्यंतची रेंज. याची लाँग रेंजबद्दल बोलायचे झाले तर 90kW पावर आणि 190Nm टॉर्क जनरेट करते. तर छोट्या व्हर्जनमध्ये 60kW की पावर आणि 114Nm चा टॉर्क जनरेट करते आहे.
4. वेगवेगळ्या व्हेरिएंटचे खास फीचर्स
कंपनी स्मार्ट व्हेरिएंटमध्ये एलईडी हेडलॅम्प्स, स्मार्ट डिजिटल DRL, मल्टी मोड रीजेनवर इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी प्रोग्राम (ESP)आणि ६ एअरबॅग देण्यात आले आहे.
Adventure व्हेरियंटमध्ये स्मार्ट व्हेरिएंटमध्ये कॉर्नरिंगसह फ्रंट फॉग लॅम्प, हरमनची 17.78 सेमी इंफोटेनमेंट सिस्टम, ऑटोहोल्डसह EPB (फक्त लांब श्रेणी), ज्वेलेड कंट्रोल नॉब (फक्त लांब रेंज) आणि सनरूफ सारखी वैशिष्ट्ये कंपनीने यामध्ये देखील आहेत.
Empowered व्हेरियंटमध्ये 16-इंच डायमंड कट अलॉय व्हील, AQI डिस्प्लेसह एअर प्युरिफायर, ऑटो फोल्ड ORVM, 17.78 सेमी डिजिटल डिस्प्ले, SOS फंक्शन, 26.03 सेमी इंफोटेनमेंट सिस्टम, ड्युअल टोन बॉडी मिळते.
Empowered+ प्रकारात लेदर सीट्स, 360 डिग्री कॅमेरा, ब्लाइंड स्पॉट मॉनिटर, व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स, Arcade.ev अॅप सूट, वायरलेस फोन चार्जर आणि 26.03 सेमी डिजिटल कॉकपिट आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.