Whatsapp Feature: व्हॉट्सअ‍ॅपचे नवीन फीचर! आता अँड्रॉइडमध्ये करता येणार कस्टमाइज टेक्स्ट

Whatsapp Feature For Android: जगभरात लाखो लोक व्हॉट्सअ‍ॅपचा वापर करतात. युजर्ससाठी व्हॉट्सचा वापर सोपा व्हावा यासाठी नवनवीन फीचर्स लाँच होत असतात. व्हॉट्सअ‍ॅपमध्ये आता नवीन फॉरमॅटिंग टूल्स येणार आहेत.
WhatsApp New Features
WhatsApp New Features Saam Tv
Published On

Whatsapp Text Formatting Feature:

जगभरात लाखो लोक व्हॉट्सअ‍ॅपचा वापर करतात. कोणतीही माहिती मिळवण्यासाठी किंवा पाठवण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅपचा वापर करतात. युजर्ससाठी व्हॉट्सचा वापर सोपा व्हावा यासाठी नवनवीन फीचर्स लाँच होत असतात. व्हॉट्सअ‍ॅपमध्ये आता नवीन फॉरमॅटिंग टूल्स येणार आहेत. (Latest News)

IOS आणि वेबसाठी व्हॉट्सअ‍ॅपमध्ये कोड ब्लॉक्स, क्वोट ब्लॉक्स Quote Blocks, आणि टेक्स्ट मेसेजसाठी नवीन फॉर्मॅटिंग टूल्स होते. यानंतर आता अँड्रॉइड युजर्ससाठी हे टूल्स आणले जात आहेत. त्यामुळे अँड्रॉइड युजर्स आता व्हॉट्सअॅप बीटमाध्ये आपला टेक्स्ट फॉरमॅट करु शकणार आहे.

टेक्स्ट फॉरमॅट करण्यासाठी एकूण सात मार्ग देण्यात आले आहे. या नवीन फीचरमध्ये तुम्हाला तीन उपयुक्त टूल्स देण्यात आले आहेत. ज्याचा वापर करुन युजर्स टेक्स्ट आपल्या पद्धतीने कस्टमाइज करु शकतात. हा टेक्स्ट तुम्ही बोल्ड, इटॅलिक, Strike Through आणि मोनोस्पेस देण्याची परवानगी देतात.

WhatsApp New Features
Gold Silver Rate (17th January 2024): सोन्याचा भाव ३८० रुपयांनी घसरला, चांदीची चकाकी नरमली; जाणून घ्या मुंबई-पुण्यातील आजचा भाव

या नवीन फीचरचा वापर करुन तुम्ही तुमच्या पद्धतीने शब्दांची वाक्यरचना शॉर्टकट पद्धतीने करु शकतात. यामुळे तुम्ही मध्येच एखादा शब्द बोल्ड करु शकता. त्यामुळे महत्त्वाचे शब्द स्पॉट होण्यास मदत होते. याचा वापर करुन तुम्ही हायलाइट करण्यासाठी बोल्ड, अक्षरे लहान करण्यासाठी इटॅलिक आणि Strike through आणि मोनोस्पेसचा वापर करु शकता.

WhatsApp New Features
Share Market: धडामधूम! शेअर बाजार खुलताच सेन्सेक्स १००० अंकांनी आपटला; मिनिटाभरातच गुंतवणुकदारांचा खिसा रिकामा

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com