Share Market: धडामधूम! शेअर बाजार खुलताच सेन्सेक्स १००० अंकांनी आपटला; मिनिटाभरातच गुंतवणुकदारांचा खिसा रिकामा

Stock Market News: बुधवारी सकाळी शेअरबाजार खुलताच सेन्सेक्स तब्बल 1000 अंकांनी आपटला. त्यामुळे गुंतवणुकदारांचे कोट्यवधी रुपये बुडाले.
Share Market Closing Update
Share Market Closing UpdateSaam Tv
Published On

Share Market Latest Marathi News

दहशतवादी कारवायांनी त्रस्त झालेल्या इराणने पाकिस्तानला मोठा दणका दिला. इराणने पाकिस्तानमध्ये घुसून सर्जिकल स्ट्राइक करत दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले. यामुळे दोन्ही देशांमध्ये मोठा तणाव निर्माण झाला आहे. याचा मोठा फटका भारतीय शेअर बाजाराला देखील बसला आहे. बुधवारी सकाळी शेअरबाजार खुलताच सेन्सेक्स तब्बल 1000 अंकांनी आपटला.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Share Market Closing Update
Gold Silver Rate (17th January 2024): सोन्याचा भाव ३८० रुपयांनी घसरला, चांदीची चकाकी नरमली; जाणून घ्या मुंबई-पुण्यातील आजचा भाव

त्यामुळे अवघ्या काही मिनिटातच गुंतवणुकदारांचे कोट्यवधी रुपये बुडाले. जागतिक शेअर बाजारातून आलेल्या नकारात्मक बातम्यांमुळे बुधवारी भारताचा बेंचमार्क इक्विटी इंडेक्स मोठ्या घसरणीसह उघडला होता. (Latest Marathi News)

बीएसईचा 30 शेअर्सचा सेन्सेक्स सुरुवातीच्या व्यवहारात 1,371.23 अंकांनी घसरून 71,757.54 वर आला. तर राष्ट्रीय शेअर बाजारात निफ्टी 395.35 अंकांनी घसरून 21,636.95 वर आला.

सेन्सेक्स कंपन्यांमध्ये एचडीएफसी बँकेचे शेअर्स (Share Market) डिसेंबरनंतर सहा टक्क्यांनी घसरले आहेत. याशिवाय अॅक्सिस बँक, टाटा स्टील, कोटक महिंद्रा बँक, आयसीआयसीआय बँक, टाटा मोटर्स आणि बजाज फायनान्सच्या शेअर्समध्येही मोठी घसरण दिसून आली.

एकीकडे बँकांचे शेअर्स आपटत असताना दुसरीकडे, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, रिलायन्स इंडस्ट्रीज, अल्ट्राटेक सिमेंट, इन्फोसिस, एचसीएल टेक्नॉलॉजीज आणि टेक महिंद्रा यांचे शेअर्स तेजीत होते. दरम्यान, मंगळवारी सुद्धा शेअर बाजारात घसरण पाहायला मिळाली होती.

देशांतर्गत शेअर बाजारात गेल्या 5 व्यापार सत्रांपासून सुरू असलेली वाढ ठप्प झाली. कमकुवत जागतिक ट्रेंडमध्ये आयटी आणि पेट्रोलियम कंपन्यांच्या समभागांच्या विक्रीमुळे बीएसई सेन्सेक्स 199 अंकांनी घसरला होता. NSE निफ्टीही 65.15 अंकांच्या घसरणीसह बंद झाला होता.

Share Market Closing Update
Mumbai Pune Expressway: मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर तब्बल ६ तासांचा ब्लॉक; कधी अन् केव्हा? सविस्तर वाचा...

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com