कार घेण्याचे प्रत्येकाचे स्वप्न असते. कार खरेदी करताना आपण सर्वप्रथम आपले बजेट बघतो. आपल्या बजेटमध्ये उत्तम कार घेण्यासाठी प्रत्येकजण वेगवेगळे पर्याय पाहत असतो. कमीत कमी बजेटमध्ये चांगली कार घ्यायचा तुम्हीही विचार करत असाल तर ही माहिती खास तुमच्यासाठी. आज आम्ही तुम्हाला ५ लाखांपेक्षा कमी किंमतीत असणाऱ्या कारची माहिती देणार आहोत. या कारचे मायलेजदेखील २० किमी प्रति लिटरपेक्षा जास्त आहे.
जर तुमचे बजेट ५ लाख रुपये असेल तर तुम्ही Maruti Alto 800 ही कार खरेदी करु शकता. या कारची किंमत ३.५४ लाख रुपये आहे. ही कार २२.०५ किमी प्रति लिटर मायलेज देते, असा दावा कंपनीने केला आहे. हे देशातील सर्वात स्वस्त कार आहे. मारुती अल्टो ८०० दोन पर्यांयासह येते. पेट्रोल आणि सीएनजी अशा दोन्ही पर्यायांमध्ये कार उपलब्ध आहे. कारचे पेट्रोल व्हर्ज 47.3 bhp पॉवर आणि 69Nm टॉर्क जनरेट करते.
भारतातील स्वस्त कारमध्ये Maruti Alto K10 कारचा समावेश आहे. या कारची किंमत ३.९९ लाख रुपये आहे. ही कार २४.३९ किमी प्रति लिटर मायलेज देते, असा कंपनीचा दावा आहे. ही कार पेट्रोल इंजिनसह सुसज्ज आहे. ही कार ५-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनसह येते.
Maruti S Presso ही कार सर्वात स्वस्त आहे. या कारची किंमत ४.२६ लाख रुपये आहे. कारमध्ये 1.0L K10B पेट्रोल इंजिन आहे. इंजिन 67bhp पॉवर आणि 9Nm टॉर्क जनरेट करते. या कारमध्ये युजर फ्रेंडली ५-स्पीड मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक गिअरबॉक्स देण्यात आले आहे. कारचे मायलेज २४.७६ किमी प्रति लिटर आहे.
Renault Kwid ही कार उत्तम फीचर्ससह बाजारात उपलब्ध आहे. या कारची किंमत ४.६९ रुपये आहे. कंपनीची ही कार २१.७० किमी प्रति लिटर मायलेज देते, असा कंपनीचा दावा आहे. ही कार 1.0L Sce पेट्रोल इंजिनसह येते. हे इंजिन 67bhp आणि 91Nm टॉर्क जनरेट करते. या कारमध्ये ५ स्पीड मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक गिअरबॉक्स देण्यात आले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.