Apple: आयफोन वापरणाऱ्यांसाठी 'हलकी फुलकी' बातमी; २०२५ मध्ये होणार मोठा बदल

Apple Iphone Will Be Thinner In 2025: अॅपल कंपनी सध्या सर्वात जास्त स्लिमर आणि लाइटर उपकरणे बनवण्यावर भर देत आहे. कंपनी लवकरच आपला सर्वात स्लिमर आयफोन लाँच करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
Apple
AppleSaam Tv
Published On

अॅपल कंपनी ग्राहकांच्या गरजेनुसार आयफोन, आयपॅड बनवत असते. ग्राहकांच्या आवश्यकतेनुसार आयफोनची क्वालिटीवर लक्ष केंद्रित करत असते. कंपनी आता लवकरच स्लिमर आणि पॉवरफुल आयपॅड आणि आयफोन बनवण्याच्या तयारीत आहे. अहवालानुसार, अॅपल कंपनी आपले डिव्हाइस अजून आकर्षक आणि युजर्ससाठी फ्रेंडली बनवण्यावर लक्ष केंद्रित करत आहे. यात आयफोन मॅकबुक, अॅपल घड्याळांचा समावेश आहे. पॉवरफुल आणि स्लिमर आयफोन बनवण्यासाठी कंपनी प्रयत्न करत आहे. आयफोन १७ हा फोन स्लिमर आणि पॉवरफुल असणार असल्याचे सांगितले आहे.

ब्लूमबर्ग अहवालात मार्क गुरमनने अॅपल प्रोडक्ट्सच्या नवीन डिझाइनबाबत माहिती दिली आहे. कंपनी सध्या टेक्नोलॉजी आणि भविष्यातील युजर्सवर काम करत आहे. विशेषतः कंपनी स्लिमर आणि लाइटर म्हणजे हलके उपरणे बनवण्याच्या तयारीत आहे. कंपनीने अलीकडे काही वर्षांपासून या गोष्टींकडे लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. कंपनीचे आताचे गॅजेट्स हे आकाराने मोठे आहे. त्यातील बॅटरी, प्रोसेसर आणि इतर फीचर्स डिव्हाइसला आकाराने मोठ बनवत आहे. उदाहरणार्थ मॅकबुक प्रोसमध्ये मोठ्या आकाराची बॅटरी देण्यात ली आहे. त्यामुळे मॅकबुकचा आकार वाढतो. तसेच अॅपल वॉचच्या अल्ट्रा मॉडेलचेही वजन तुलनेने जास्त आहे. तर आयफोनचादेखील आकार जास्त आहे.

अॅपलने मे महिन्यात आयपॅड प्रो लाँच केले होते. या आयपॅडमध्ये बदल केले आहेत. हे नवीन मॉडेल आतापर्यंत सर्वात स्लिमर मॉडेल आहे. यातील बॅटरीदेखील उत्तम काम करते. यात डिस्प्ले आणि M4 चिप देण्यात आली आहे. ज्यामुळे हे आयपॅड एखाद्या कॉम्प्युटरसारखे पॉवरफुल काम करते. कंपनीने कोणतेही फीचर्स न वगळता स्लिमर आणि लाइटर उपकरणे बनवण्यावर भर दिला असल्याचे सांगण्यात येत आहे. अॅपल्या येत्या काही दिवसात लाँच होणारे डिव्हाइस लाइटर आणि स्लिमर पाहायला मिळतील. कंपनी या नवीन ट्रेंडसाठी तयार आहे.

Apple
Gold Silver Price Down : सलग दुसऱ्या दिवशी सोने-चांदीच्या किंमती घसरल्या; वाचा तुमच्या शहरातील आजचा भाव

गुरमन यांनी दिलेल्या माहितीनुसार, अॅपल कंपनी आपल्या सर्वात जास्त स्लिमर आणि लाइटर आयफोनवर काम करत आहे. हा आयफोन २०२५ मध्ये लाँच होऊ शकतो. आयफोन १७ हा फोन सर्वात जास्त स्लिमर आणि लाइटर असण्याची शक्यता आहे. आयफोननंतर कंपनी मॅकबुक, अॅपल वॉचदेखील स्लिमर बनवण्यावर लक्ष क्रेंद्रित करत आहे.

Apple
१२ वर्षानंतर मार्केट जाम करायला Renault Duster सज्ज; काय असणार खास?

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com