Nagpur News : मोबाईलची बनावट एक्सेसरीज विक्री; चार विक्रेत्यांवर कारवाई

Nagpur News : बनावट आयफोनचे चार्जर, केबल, आयपॅड कव्हर यासारख्या वस्तूंची विक्री करत होते
Nagpur News
Nagpur NewsSaam tv

पराग ढोबळे 

नागपूर : महागड्या अशा ऍपल कंपनीचे बनावट एक्सेसरीज विक्री केली जात होती. या प्रकरणी पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी दुकानांवर धाड टाकत कारवाई केली. या कारवाईत ७९ लाखाचा मुद्देमाल हस्तगत करत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Nagpur News
Akola Rain : अकोल्यात जोरदार वाऱ्यासह पाऊस; अनेकांचे संसार उघड्यावर, केळी पिकाचे मोठे नुकसान

नागपूरात (Nagpur) सीताबर्डी पोलिस ठाण्यांतर्गत हि कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत पोलिसांनी विजय माखिजानी, नारायण मोहनांनी, रामाराम चौधरी, जेपाराम चौधरी असे कारवाई झालेल्या दुकानदारांची नाव आहे. या चौघांची सीताबर्डी पोलीस स्टेशन अंतर्गत हनुमान गल्ली परिसरात मोबाईल ॲक्सेसरीजचे दुकान आहे. त्यांच्याकडे बनावट आयफोनचे चार्जर, केबल, आयपॅड कव्हर यासारख्या वस्तूंची विक्री करत होते. याबाबत (Police) पोलिसांना माहिती मिळाली होती. 

Nagpur News
Marathwada Water Crisis : मराठवाड्यातील ७ धरण कोरडी; उर्वरित धरणातही १० टक्केच पाणीसाठा

कॉपीराईट अंतर्गत गुन्हा दाखल 
मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी धाड टाकत कारवाई केली आहे. या कारवाईत चारही दुकानातून ७९ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच त्यांच्यावर ब्रँडेड वस्तूची कॉपीराईट यासह विविध कलमाने गुन्हा दाखल करण्यात आला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com