छत्रपती संभाजीनगर : यंदाची भीषण पाणी टंचाई वाढतच चालली आहे. त्यात मराठवाड्यात पाण्याची समस्या अधिक गडद असनू आता मराठवाड्यातील पाणी संपण्याच्या मार्गावर आहे. कारण मराठवाड्यातल्या ११ मोठ्या धरणांपैकी ७ धरणं कोरडी पडली आहेत. तर उर्वरित ४ धरणात सरासरी १० टक्के इतका पाणीसाठा शिल्लक आहे.
कमी पावसामुळे राज्यातच पाण्याची भीषण टंचाई (Water Scarcity) जाणवत आहे. अगदी मार्च महिन्यापासून राज्यातील अनेक भागात पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागत आहे. धरणात मुबलक पाणीसाठा नसल्याने तसेच बाष्पीभवनामुळे पाण्याची पातळी आणखी खालावल्याने टंचाई अधिक तीव्र झाली होती. (Marathwada) मराठवाड्याची देखील हीच परिस्थिती असून मराठवाड्यात ११ मोठे धरण असून देखील येथे मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई जाणवत आहे. आता मराठवाड्यात मोठा पाऊस आल्यावरच ही पाण्याची मोठी अडचण दूर होईल.
मराठवाड्यातील ११ धरणांपैकी ७ धरण कोरडे पडले आहेत. तर उर्वरित ४ धरणात सरासरी १० टक्के साठा शिल्लक राहिला आहे. तर मध्यम आणि लघु प्रकल्प पुर्णतः कोरडे ठाक पडले आहेत. त्यातील मृत पाणीसाठा सध्या उपसा केला जात आहे. आजघडीला (Jayakwadi dam) जायकवाडी धरणात ४ टक्के, येलदरी २६ टक्के, पैनगंगा ३० टक्के, विष्णुपरी १६.३ टक्के पाणीसाठा आहे. तर निम्न दुधना, सिद्धेश्वर, माजलगाव, मांजरा, मनार, सिना कोळेगाव, निम्न तेरणा हे प्रकल्प मृत साठ्यात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.