१२ वर्षानंतर मार्केट जाम करायला Renault Duster सज्ज; काय असणार खास?

Renault Duster New Varient : रेनॉल्ट ही वाहन उत्पादक कंपनी ग्राहकांसाठी नवनवीन कार लाँच करत असते. कंपनी लवकरच आपल्या Renault Duster कारचे नवीन व्हेरियंट लाँच करणार आहे. ही कार १२ वर्षांपूर्वी लाँच केली होती.
Renault Duster
Renault DusterSaam Tv
Published On

रेनॉल्ट ही वाहन उत्पादक कंपन्यापैकी नावाजलेली कंपनी आहे. कंपनी नेहमी उत्कृष्ट दर्जाच्या कार ग्राहकांसाठी बाजारात लाँच करत असते. कंपनीच्या रेनॉल्ट डस्टर या कारची क्रेझ आजही आहे. कंपनीने २०१२ मध्ये ही कार लाँच केली होती. त्यानंतर आता ही कार पुन्हा एकदा नवीन रुपात लाँच करण्यात येणार आहे.काही कारणांनी कंपनीच्या या कारचे उत्पादन भारतात बंद करण्यात आले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा कार बाजारात लाँच होणार आहे. जाणून घेऊया या कारबद्दल.

भारतात कमबॅक करणाऱ्या रेनॉल्ट डस्टर या कारचे नाव बिगस्टर असू शकते. या कारचा ७ सीटर व्हेरियंटदेखील लाँच केा जाऊ शकतो. या कारमध्ये मोठी व्हीलबेसदेखील मिळू शकते. नवीन कार ही आकर्षक डिझाइन आणि अॅडव्हान्स टेक्नोलॉजीसह लाँच होऊ शकते. या कारमध्ये व्हीआर्क डिझाइन, डडोअर मोल्डिंग, रनिंग बोर्डसवरील साईल क्लोडिंग कमी करण्यात आली आहे. सध्या या कारची चाचणी सुरु आहे. या कारबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

नवीन कारचे फीचर्स

नवीन रेनॉल्ट डस्टर CMF-B प्लॅटफॉर्मवर तयार केली जात आहे. या कारमध्ये अॅडव्हान्स ड्रायव्हिंग आणि कनेक्टिव्हिटी टेक्नॉलॉजी पाहायला मिळणार आहे. तसेच कारमध्ये अॅडव्हान्स ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टिम देण्यात येणार आहे. या कारमध्ये अनेक सेफ्टी फीचर्स देण्यात आले आहे.

या कारच्या इंजिनमध्ये फार काही बदल करण्यात आलेला नाही. या कारमध्ये १०.१ इंच इन्फोटेक स्क्रिन आणि ७ इंचाचा टीएफटी इन्स्ट्रुमेंट कलस्टरसारखी वैशिष्ट्ये दिली जाऊ शकतात. कारमध्ये १.६ लिटर ई-टेक हायब्रिड पॉवरट्रेन इंजिन दिले जाऊ शकते. हे इंजिन 140bhp पॉवर जनरेट करेन.

Renault Duster
Government Scheme: गरोदर महिलांना सरकार देणार ६ हजार रुपये; कसं? जाणून घ्या

या नवीन कारची चाचणी सध्या सुरु आहे. ही कार भारतात २०२५ च्या सहा महिन्यात लाँच केली जाऊ शकते. ही कार आधीपेक्षा चांगल्या वैशिष्ट्यांसह लाँच होणार आहे. या ७ सीटर कारची किंमत १४-१८ लाख रुपये असण्याची शक्यता आहे.

Renault Duster
उत्तम फीचर अन् 50MP कॅमेरा असलेल्या Moto Edge 50 Pro स्मार्टफोनवर मिळतेय ९ हजारांची सूट; जाणून घ्या ऑफर

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com