E Shram Card Yojana: असंघटित क्षेत्रातील कामगारांना मिळणार पेन्शन; जाणून घ्या काय आहे योजना?

E Shram Card Benefit: असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांसाठी सरकार एक योजना राबवत असते. या योजनेअंतर्गत सरकार कामगारांना आर्थिक मदत करत आहे.
E Shram Card Yojana: असंघटित क्षेत्रातील कामगारांना मिळणार पेन्शन; जाणून घ्या काय आहे योजना?
E Shram CardGoogle
Published On

सरकार नेहमी नागरिकांसाठी वेगवेगळ्या योजना राबवत असते. नागरिकांना आर्थिकदृष्ट्या मदत करण्यासाठी अनेक योजना असतात. त्यातीलच एक योजना म्हणजे ई- श्रम कार्ड. लोकांच्या गरजा लक्षात घेऊन ई- श्रम योजना राबवली जात आहे. असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांसाठी ही योजना राबवण्यात आली आहे. या योजनेद्वारे लाखो कर्मचाऱ्यांना फायदा होत आहे.

ई श्रम योजना ही असंघटित क्षेत्रातील लोकांना आर्थिक मदत मिळवून देतात.यासाठी कर्मचाऱ्यांना ई- श्रम कार्ड जारी केली जाते. या कार्डच्या माध्यमातून नागरिकांना मदत केली जाते. असंघटित क्षेत्रातील कामगार ई-श्रम पोर्टलवर नोंदणी करु शकतात.

ई श्रम योजनेअंतर्गत कामगारांना दर महिन्याला पेन्शन मिळते. वयाच्या ६० वर्षानंतर दर महिन्याला ३ हजार रुपयांनी पेन्शदेखील त्यांना मिळणार नाही. या योजनेत जर कोणत्या व्यक्तीचा मृत्यू झाला किंवा एखादा व्यक्ती दिव्यांग असेल तर त्यांना २ लाख रुपयांचा विमा मिळणार आहे. तर अंपगत्व आल्यास १ लाख रुपयांची आर्थिक मदत मिळेल, ई श्रम कार्ड असलेल्या व्यक्तीला २ लाख रुपयांचा अपघात विमादेखील मिळणार आहे.

E Shram Card Yojana: असंघटित क्षेत्रातील कामगारांना मिळणार पेन्शन; जाणून घ्या काय आहे योजना?
Apple: आयफोन वापरणाऱ्यांसाठी 'हलकी फुलकी' बातमी; २०२५ मध्ये होणार मोठा बदल

ई श्रम कार्डसाठी पात्रता

कामगार हा असंघटीत क्षेत्रात काम करणारा असायला हवा. त्याचे वय १९-५९ वर्ष असणे गरजेचे आहे.

ई-श्रम कार्ड काढण्यासाठी आधार कार्ड,आधार कार्डशी जोडलेला मोबाईल नंबर, बँक खाते असणे गरजेचे आहे. या योजनेत तुम्ही ऑनलाइन पद्धतीने अर्ज करु शकता. यासाठी तुम्हाला ई- श्रम योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करावा लागेल.

E Shram Card Yojana: असंघटित क्षेत्रातील कामगारांना मिळणार पेन्शन; जाणून घ्या काय आहे योजना?
Gold Silver Price Down : सलग दुसऱ्या दिवशी सोने-चांदीच्या किंमती घसरल्या; वाचा तुमच्या शहरातील आजचा भाव

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com