TATA CURVV zee
बिझनेस

TATA कंपनीची कमाल, बाजारात आणली धमाल कूप स्टाइल SUV कार; फीचर्स पाहून पडाल प्रेमात, जाणून घ्या किंमत

Bharat Jadhav

टाटा मोटर्सने आपली बहुप्रतिक्षित कूप-शैलीची SUV, CURVV कार लॉन्च केलीय. ही कार इलेक्ट्रिक (EV) आणि इंटरनल कम्बशन इंजिन (ICE) या दोन प्रकारांमध्ये उपलब्ध आहे. यामुळे ग्राहक त्यांच्या आवडीचा पर्याय निवडू शकतात. कंपनीने लॉन्च केलेली कार ही एक कूप स्टाइल एसयूव्ही आहे, जी अतिशय स्टायलिश आणि युनिक आहे. दरम्यान कूप स्टाईल कार भारतात नवीन आहेत. कंपनीने असे मॉडेल लॉन्च करून मोठी रिस्क घेतलीय. त्यामुळे जर ही रिस्क हिट ठरली तर कंपनीचं चांग भलं होईल. नाहीतर कंपनीला मोठा फटका बसणार आहे.

स्टायलिश डिजाइन:

CURVVमध्ये एक आकर्षक आणि स्पोर्टी डिझाइन आहे, यामुळे ही कार गर्दीतही सहज ओळखता येईल. या कारला ठळक फ्रंट ग्रिल, स्लीक हेडलॅम्प, कूप सारखी रूफलाइन आणि स्टायलिश अलॉय व्हील्स आहेत.

CURVV मध्ये एक प्रीमियम आणि आरामदायक इंटीरिअर आहेत. यात अनेक सुविधा देण्यात आल्यात. यात 12.3-इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, पॅनोरॅमिक सनरूफ, हवेशीर फ्रंट सीट्स, वायरलेस चार्जिंग आणि इतर अनेक फीचर्स आहेत.

CURVV दोन इंजिन पर्यायांसह उपलब्ध आहे. यातील इलेक्ट्रिक CURVV EV मध्ये 40kWh बॅटरी पॅक आहे जे 300 किमी आणि 170bhp पॉवर प्रदान करत असते. पेट्रोल इंजिन - CURVV ICE 1.2-लिटर टर्बो पेट्रोल इंजिन आहे. जे 125bhp पॉवर आणि 170Nm टॉर्क निर्माण करते. CURVV मध्ये एअर बॅग्स आहेत. ABS, EBD, ESP आणि TCS सारख्या सुरक्षा देखील या कारमध्ये आहेत.

CURVV EV ची किंमत 15 लाख रुपयांपासून सुरू होते. तर CURVV ICE ची किंमत 12 लाखांपासून सुरू होते. CURVV ही भारतातील कूप-शैलीतील SUV विभागातील एक नवीन कार आहे. स्टायलिश डिझाईन, आधुनिक वैशिष्टय़े, दमदार कामगिरी आणि परवडणारी किंमत यामुळे ग्राहकांना आकर्षित करण्यात ही कार यशस्वी ठरेल असं म्हटलं जात आहे. ही भारतातील पहिली कूप-शैलीची SUV आहे. ही कार इलेक्ट्रिक प्रकारातही उपलब्ध आहे. ही टाटाची पहिली कार आहे जी Tata Gen 2 EV प्लॅटफॉर्मवर आधारित आहे.

चालकाला कार चालवतांना आनंद मिळेल याची दक्षता घेऊन ही कार बनवण्यात आलीय. जर तुम्ही स्टायलिश, आधुनिक आणि परवडणारी SUV कार घेण्याचा विचार करत असाल तर CURVV ही कार बेस्ट पर्याय ठरेल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today Horoscope : जुना अबोला मिटेल,घरात उत्साहाचे वातावरण राहील; वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today : आज विनाकारण शत्रुत्व ओढवून घ्याल, दानधर्मासाठी खर्च कराल; वाचा तुमच्या नशिबात आज काय लिहिलंय?

Fact Check : गणपतीसारख्या दिसणाऱ्या बाळाचा जन्म? काय आहे व्हायरल व्हिडिओमागचं सत्य?

Maharashtra Politics: महायुतीचं बेताल त्रिकूट; देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याला नेत्यांकडून हरताळ

Save Mangroves : कांदळवन सुरक्षेसाठी १२० कोटी; १९५ ठिकाणं, ६६९ CCTV कॅमेरे, सरकारचा प्लान की पांढरा हत्ती?

SCROLL FOR NEXT