SupreSupreme Court Railway Ticketme Court Railway Ticket meta ai
बिझनेस

Supreme Court Railway Ticket : ट्रेनमधून पडून मृत्यू झालेल्या व्यक्तींना मिळणार नुकसानभरपाई, सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

Supreme Court Railway Ticket Case : रेल्वे अपघातात मृत्यू झालेल्या प्रवाशाचं तिकीट सापडलं नाही म्हणून नुकसानभरपाई नाकारता येणार नाही, असा सुप्रीम कोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय.

Sakshi Sunil Jadhav

तुम्ही रोज रेल्वेने प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. रेल्वे प्रवाशांच्या कुटुंबीयांसाठी सुप्रीम कोर्टाने मोठा निर्णय घेतला आहे. रेल्वे प्रवासादरम्यान अपघाच होऊन प्रवाशाचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्याकडे तिकीट सापडलं नाही, म्हणून नुकसानभरपाईचा दावा सरसकट फेटाळता येणार नाही, असा महत्त्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. गुजरातमधल्या २०१७ च्या एका प्रकरणात न्यायालयाने मृत प्रवाशाच्या आई-वडिलांना देण्यात आलेली ८ लाखांची नुकसानभरपाई पुन्हा बहाल (Restore/Reinstate) केली आहे. ही रक्कम ३० दिवसांच्या आत देण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत.

नेमकं प्रकरण काय?

२७ सप्टेंबर २०१७ रोजी महेशभाई अहमदाबादमार्गे सुरतकडे रेल्वेने प्रवास करत होते. प्रवासादरम्यान ट्रेनला अचानक धक्का बसल्याने ते सामान्य डब्यातून खाली पडले. या दुर्घटनेत त्यांना गंभीर दुखापत झाली. उपचारासाठी त्यांना एक महिन्यापेक्षा जास्त काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र ३१ ऑक्टोबर २०१७ रोजी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

मृताच्या आई-वडिलांनी नुकसानभरपाईसाठी रेल्वे दावा न्यायाधिकरणाकडे अर्ज केला. १७ जून २०२२ रोजी न्यायाधिकरणाने महेशभाई हे वास्तविक रेल्वे प्रवासी असल्याचं मान्य करत ८ लाखांची नुकसानभरपाई आणि घटनेच्या तारखेपासून ९ टक्के वार्षिक व्याज देण्याचा आदेश दिला. मात्र, गुजरात उच्च न्यायालयाने मृत व्यक्तीचं रेल्वे तिकीट सादर झालं नसल्याचा कारण्यावरून हा दावा फेटाळला आहे.

सुप्रीम कोर्टाने काय म्हटलं?

सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द करताना सांगितलं की, मृत प्रवाशाकडून तिकीट सापडलं नाही, एवढ्या कारणावरून नुकसानभरपाई नाकारता येणार नाही. मृताच्या वडिलांनी शपथेवर मुलाने तिकीट खरेदी केल्याचं सांगितलं होतं. तसेच अपघातानंतर महेशभाई दीर्घकाळ रुग्णालयात उपचार घेत असल्याने तिकीट सुरक्षित ठेवले गेले नसण्याची शक्यता न्यायालयाने लक्षात घेतली.

रेल्वेकडून करण्यात आलेल्या तपासातही प्रवाशाच्या खिशांची योग्य तपासणी करण्यात आली नसल्याचं न्यायालयाने नमूद केलं. त्यामुळे तिकीट उपलब्ध नसल्याचा फायदा रेल्वेला देता येणार नाही, असं स्पष्ट करत न्यायालयाने ८ लाखांची नुकसानभरपाई बहाल केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांची तब्येत खालवली; तातडीनं रुग्णालयात दाखल

विधानपरिषद निवडणुकीत शिंदेसेना-भाजप आमनेसामने; महायुतीतला वाद चव्हाट्यावर

रामलीला मैदानावर रावणासोबत झुरळही जाळणार; स्वच्छ भारत अभियानाचा दावा की राजकीय निशाणा?

CJPच्या आंदोलनाआधीच दिपके पोलिसांच्या ताब्यात; दिल्लीत पुन्हा एकदा हायव्होल्टेज ड्रामा

तिकीट तपासणीवरून महिला प्रवासीचा टीसीसोबत वाद; कांदिवली स्टेशनवर नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT