Sukanya Samruddhi Yojana Saam Tv
बिझनेस

Sukanya Samruddhi Yojana: आताच करा 'हे' काम! ..अन्यथा सुकन्या समृद्धी योजनेचे खाते होणार बंद!

Sukanya Samruddhi Yojana New Rule: सुकन्या समृद्धी योजनेच्या नियमांमध्ये नवीन बदल झाले आहेत. या नियमानुसार तुम्ही हे महत्त्वाचे काम केले नाही तर तुमचे खाते बंद होऊ शकते.

Siddhi Hande

सरकारने मुलींसाठी सुकन्या समृद्धी योजना राबवली आहे. या योजनेच्या नियमांमध्ये आता मोठा बदल करण्यात आला आहे. त्यामुळे सुकन्या समृद्धी योजनेसंदर्भात ही कामे लवकरात लवकर करा अन्यथा तुमचे खाते बंद होईल. सुकन्या समृद्धी योजनेत फक्त मुलींचे आईवडील खाते उघडू शकतात.

जर सुकन्या समृद्धी योजनेतील खाते तुमच्या आजी- आजोबांनी उघडले असेल तर तुमचे हे खाते बंद होऊ शकते. त्यामुळे तुमच्या आजी आजोबांनी उघडलेले खाते लवकरात लवकर आईवडीलांच्या अकाउंटला ट्रान्सफर करा.

सुकन्या समृद्धी योजनेच्या नियमांमध्ये बदल करण्यात आला आहे. याबाबत नवीन निर्देश जाहीर करण्यात आले आहे. या निर्देशानुसार, फक्त आईवडील तुमच्या नावाने अकाउंट उघडू शकतात.

सुकन्या समृद्धी योजनेत खाते ट्रान्सफर करण्यासाठी काय करावे लागेल?

तुम्हाला बँक खाते ट्रान्सफर करण्यासाठी पासबुक, जन्माचा दाखला, मुलीसोबतच्या नात्याचे प्रमाणपत्र, पालकांचे ओळख प्रमाणपत्र, अर्जाचा फॉर्म ही कागदपत्रे आवश्यक आहे. तुम्ही पोस्ट ऑफिस किंवा बँकेत खाते उघडताना जो फॉर्म भरलेला तो पुरावा म्हणून देणे आवश्यक आहे.

सर्वप्रथम तुम्हाला पोस्ट ऑफिस किंवा बँकेत जावे लागेल. ज्या बँकेत किंवा पोस्ट ऑफिसमध्ये तुम्ही खाते उघडले आहे त्या ठिकाणी जाऊन खाते ट्रान्सफर करु शकतात. यासाठी तुम्हाला सर्वप्रथम बँक किंवा पोस्ट ऑफिसद्वारे ट्रान्सफर फॉर्म भरावा. त्यानंतर त्या फॉर्मवर तुमचे आजी आजोबा आणि आईवडीलांची सही घ्या. यानंतर तुम्हाला आवश्यक कागदपत्रे जमा करावी लागतील. कागदपत्रे जमा केल्यानंतर तुमच्या फॉर्मचे व्हेरिफिकेशन केले जाईल. त्यानंतर तुम्हाला खाते ट्रान्सफर केल्यानंतर माहिती दिली जाईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cleaning Tips: ब्लँकेट रजाईला दुर्गंधी येते का? हे उपाय एकदा करून बघा

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : एकनाथ शिंदे, अजित पवार आणि जयंत पाटील आघाडीवर

Lucky Zodiac Sign: आज या राशीचं नशीब चमकणार; शुभ बातमी कळणार

Maharashtra Election Result: फक्त लीड मोजा, १६० जागांवर महायुती येणारच; मुख्यमंत्री दिल्लीत ठरणार- चंद्रकात पाटील

Assembly Election Results : राजकीय हलचालींना सुरवात; ओझर विमानतळावर खासगी विमान दाखल

SCROLL FOR NEXT