विनय हिरेमठ हे एक यशस्वी उद्योजक आहेत, ज्यांनी लहान वयातच मोठी कंपनी स्थापन केली आणि ती विकली. परंतु, त्याचे कंपनी विकण्याचे कारण फारच आश्चर्यकारक आहे. आपल्या प्रेयसीसोबत ब्रेकअप झाल्यानंतर त्याने ही कंपनी विकण्याचा निर्णय घेतला. त्याने आपली कंपनी ९७५ दशलक्ष डॉलर्स (सुमारे ८४०० कोटी रुपये) मध्ये विकली, जे १०-२० कोटी रुपयांपेक्षा खूप मोठी रक्कम आहे. या विक्रीनंतर, त्याने सोशल मीडियावर लोकांना प्रश्न विचारला आहे की, ही प्रचंड रक्कम कुठे आणि कशी खर्च करावी? विनय हिरेमठच्या या निर्णयाने अनेकांच्या मनात उत्सुकता निर्माण केली आहे.
३३ वर्षीय विनय हिरेमठ हे भारतीय वंशाचे व्यापारी असून, सध्या अमेरिकेत राहतात. ते लूम कंपनीचे सह-संस्थापक होते, आणि २०२३ मध्ये त्यांनी आपली कंपनी ९७५ दशलक्ष डॉलर्स (सुमारे ८४०० कोटी रुपये) मध्ये विकली, जी ॲटलासियनने विकत घेतली. कंपनी विकल्यानंतर, विनय रातोरात अब्जाधीश झाले. त्यांच्या या विक्रीनंतर, त्यांनी एक दीर्घ ब्लॉग लिहिला असून, त्यात त्यांनी आपल्या आयुष्यात झालेल्या बदलांची सविस्तर माहिती दिली आहे. या ब्लॉगमध्ये त्यांनी आयुष्यात आलेल्या अनुभव आणि निर्णयांविषयी विचार व्यक्त केले आहेत, जे वाचकांना प्रेरणा देतात.
विनय हिरेमठ यांनी आपल्या ब्लॉगमध्ये सांगितले की, "मी आता एक श्रीमंत व्यक्ती आहे, पण माझ्या आयुष्याचे नक्की पुढे काय करावे हे मला समजत नाही. गेल्या वर्षी मी कंपनी विकली आणि आता मी अशा परिस्थितीत आहे की, मला पुन्हा काम करण्याची आवश्यकता नाही. गेल्या वर्षीचे काही क्षण माझ्यासाठी खूप कठीण होते. मला प्रत्येक गोष्टीत काहीतरी नवीन जाणवतं, पण ती प्रेरणादायी नाही. मी इतके पैसे कमावले आहेत, पण त्यांचा वापर कसा करावा हे मला समजत नाही." विनयच्या या विचारांमध्ये त्याच्या यशापेक्षाही त्याच्या आंतरिक संघर्षाची झलक दिसते.
विनय हिरेमठ यांनी आपल्या ब्लॉगमध्ये त्याच्या मैत्रिणीबद्दल उल्लेख केला आहे. त्याने सांगितले की, "माझ्या मैत्रिणीसोबत दोन वर्षे अत्यंत सौहार्दपूर्ण संबंध होते, पण माझ्या असुरक्षिततेमुळे मी तिच्याशी संबंध तोडले. हे खूप दुःखदायक होते, पण घेतलेला निर्णय योग्य ठरला." विनयने आपल्या मैत्रिणीसाठी ब्लॉगमध्ये दिलगीरी व्यक्त केली आहे आणि लिहिले आहे, "प्रत्येक गोष्टीसाठी धन्यवाद. मला माफ करा की तुम्हाला जे हवे होते ते मी होऊ शकलो नाही." त्याच्या या माफीने त्याच्या वाचकांना भावनिक पातळीवर स्पर्श केला असून, त्याच्या अंतर्गत संघर्षाची झलक दाखवली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.