
आज संपूर्ण महाराष्ट्राचं लक्षं लागल आहे. जे काही जाहीरनाम्यात आश्वासन दिले. लाडक्या बहिणींना २१०० देतात की १५०० देतात, त्यांनी मत दिले त्यांचा सन्मान करावा. कर्जमाफी संदर्भात छाती फुकून सांगितलं कर्ज मुक्त करू यात निर्णय होतो का? शिंदे मुख्यमंत्री असताना मुख्यमंत्री दूत यांची काय स्थिती आहे, वापरला आणि फेकून दिले. तरुणांच्या जीवनाशी खेळ चालू आहे.
धान खरेदी, ३१ तारखेची मुद्दत असताना अजून नोंदणी झाली नाही, मुद्दत वाढ करा शेतकरी मागत आहे. मंत्रिमंडळ असताना निर्णय घेण्यायाचा अधिकार मुख्यमंत्री याना आहे. बाकीचे मंत्री कोमात गेल्यासारखं वाटतं मंत, मंत्री अजून चार्ज घेतला नाही, बंगला वाटपावरून, अधिकार, खात्यावरून भांडण सुरू आहे.
पोलीस स्टेशनमध्ये बेड घेऊन गेलेत, यापूर्वीच असे कधी झाले नाही, पोलिसांसाठी होते, हे कोणाचे लाड आहे, वालकीम कराडचे लाड पुरवेल जात आहे, यावर चौकशी झाली पाहीजे. मोठया आकाला वाचवण्यासाठी या लहान आका वाल्मिक कराडचा एन्काऊंटर होऊ शकतो. एका जवळच्या उच्चपदस्थ अधिकारी खात्रीलायक माहिती दिली. सत्तेसाठी जगणारे आहे, लढण्याची प्रवृत्ती संपली आहे, त्यामुळे धावपळ सुरू आहे, माजी आमदार आहे. किती लोकांना भाजप अजून सामावून घेणार आहे. कोंबड्याचं कुऱ्हाड झाल्यासारखं होऊ नये.
बावनकुळे हे नागपूरचे आहे त्यामुळे त्यांच्या जिल्ह्याचे पालकमंत्री घेतलं असेल तर त्यावर बोलण्याची गरज नाही. जिल्ह्यात अनेक प्रश्न आहे, पालकमंत्री नेमले जात नाही, काय चाललं, मुख्यमंत्री यांनी 26 जानेवारीतील सर्व झेंडे फडकवावे नाव लिहून झेंडे उभारावे आणि त्यांनीच दोन-दोन मिनिटे देऊन सगळे झेंडे फडकवावे. लोकांना वाऱ्यावर सोडून मलिदा खाण्याचा काम सुरू आहे. थोडी तरी जनाची नाही तर मनाची ठेवा.
बीडचे पोलीस किंवा जिल्हाधिकारी यांच्या अनुभव आहे. तिथं मार्जितला माणूस दिला जातात. कराडाला बाप मानून पोलीस वागत होते, 22 दिवस पकडू शकले नाही, गृहमंत्री यांनी लक्ष दिलं पाहिजे. पोलिसांची प्रतिमा मलिन होत आहे. त्याकडे लक्ष दिले नाही तर पोलीस विभागाचा वाटोळं झाल्याशिवाय राहणार नाही.
- सीआयडी तपास सुरू होता SIT कशाला नेमली, स्वतंत्र चौकशी ठरेल का? काय चांगलं काम करतील म्हणून नेमले का? आरोपी बाहेर येऊ नये. ९० दिवसाच्या आत चार्जशीट कोर्टात गेली पाहिजे.
-२०१४ ते २०१९ चा Cag रिपोर्ट आला मराठवाडामधील कामाचा हिशोब लागत नाही, काम झाले की नाही बिल काढले, या कामात यादी मराठवाडा येथील आहे, बीडमध्ये मोठी यादी आहे. बीड संवेदनशील जिल्हा झाला आहे.
- अजित दादांच्या साकडे करून मागणी करत असेल तो विठ्ठल ठरवेल. (शरद पवार) आपण सगळे विठ्ठलावर सोडून देऊ आपली प्रतिक्रिया देण्यापेक्षा विठ्ठलाच्या मनात नेमकं काय आहे ते विठ्ठल ठरवेल.
- लोटांगण घाला की अंगावर पेट्रोल टाका याचा निर्णय दोन नेत्यांना घ्यायचा आहे, मंत्रिपद मिळवण्यासाठी झिरवळ यांचा निर्णय योग्य होता, महाराष्ट्र विचारे लोटांगण वाया गेलं की फायदा झाला.
- नाराजी व्यक्त करून पर्याय काय, एक तर भाजपकडे जा नाहीतर घरी बसा.
ओबीसी नेत्याला महाराष्ट्रमध्ये सरकारने दूर उपयोग केला, सत्तेबाहेर ठेवलं, मोठ्या नेत्याला मत मिळाली, याचा फायदा भाजपला झाला. भुजबळ यांना भोपळा दिला. ओबीसीला गृहीत धरून ओबीसीच्या भावनांशी खेळणार आहे सरकार आहे. भुजबळ यांच्याकडे फार काही पर्याय नाही. आरोपावरून मुंडेंची विकेट काढून भुजबळांचा समावेश करण्याचा विचार अजित दादाच्या मनात आहे काय आहे? अजित पवार मुंडे यांच्या प्रकरणात अजिबात बोलत नाही, अजित दादा आरोप होत असताना, मात्र शांत बसले. यात कुछ तो गडबड है. भुजबळ यामध्ये भूमिका ठेवावी लागेल. देवेंद्र फडणवीस यांच्या सोबतच्या भेटीत काहीतरी झाल असेल. भुजबळ यांना देशाचा ओबीसीचा नेता भाजप करेल तो पर्याय खुला राहील असं वाटतं.
विचार करू द्या, विचार करणे आणि प्रत्यक्ष निर्णय यात फरक आहे. आमची चर्चा उद्धव ठाकरे यांच्यासोबत सुरू आहे. एखाद्या पक्षाने स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला, त्यांचा मार्ग जो त्यावेळेस ठरेल, त्यावर आमचाही मार्ग ठरेल. कोर्टाने २१ तारीख जाहीर केली आहे. अडीच वर्ष सरकार आल्यानंतर काय केलं आमच्यावर आरोप होत होते. सुप्रीम कोर्टात ओबीसीचा विषय होता कोरोना काळातही आम्ही निवडणूक घेण्याचा प्रयत्न केला. आता तीन वर्षे होऊन निवडणुका होत नाही तर सत्तेचं केंद्रीकरण करण्याचं सरकारच्या डोक्यात आहे. ओबीसी वरील अन्याय सरकारला दिसत नाही का? सुप्रीम कोर्टाकडे बोट का दाखवतात हे आमचे मागणी.
सरकारला आढावा घेऊ द्या मी त्या संदर्भात काही बोलणार नाही सरकारला निर्णय घेण्याचा अधिकार आहे. सुरक्षा व्यवस्था ठेवली का नाही ठेवली का आताही फरक पडत नाही. ५०% दरवाढ करा, घोटाळे करा, दोन हजार कोटीचा घोटाळा झाला त्याची चौकशी करा हा फार मोठा घोटाळा आहे. एसटी तोट्यात असताना संकटात असताना पैसे काढून खान भ्रष्टाचार करणे अधिकारी यांनी तंत्राटदार नाही. जे काही खाद्याचे मंत्री आणि अधिकारी आहे सर्व त्यात दोषी आहे १५% दरवाढ करून गरिबांना लुटून मोठ्याना वाटा देण्याच काम आहे.
Edited By: पराग ढोबळे, साम टीव्ही प्रतिनिधी
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.