Success Story Saam Tv
बिझनेस

Success Story: वडील सीट कव्हर बनवतात, चटणी भाकर खाऊन दिवस काढले, श्वेताने जिद्दीने क्रॅक केली NEET, आता होणार डॉक्टर

Success Story Of Prayagraj Shweta Crack NEET: प्रयागराजच्या श्वेताने नीट परीक्षा क्रॅक केली आहे. त्यांनी कोणत्याही कोचिंग क्लासेसशिवाय ही परीक्षा केली आहे. आता ती डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण करणार आहे.

Siddhi Hande

आयुष्यात प्रत्येकाचे काही न काही स्वप्न असते. अनेकांना डॉक्टर, इंजिनियर आणि आयएएस ऑफिसर व्हायचे असते. या पदावर काम करण्यासाठी परीक्षा द्याव्या लागतात. त्यामध्ये पास झाल्यावरच तुम्हाला पुढे यश मिळते. तुम्ही पुढचा अभ्यास करु शकतात. असंच डॉक्टर होण्यासाठी NEET परीक्षा द्यावी लागते. नीट परीक्षेत पास झाल्यावरच तुम्हाला पुढे मेडिकलसाठी अॅडमिशन मिळते.

IIT-JEEआणि NEET परीक्षेची तयारी करण्यासाठी लाखो रुपये खर्च करावे लागतात. तुम्हाला कोचिंग क्लासेस लावावे लागतात. परंतु प्रयागराजच्या श्वेताने कोणत्याही कोचिंग क्लासेसशिवाय नीट परीक्षा क्रॅक केली आहे. आता श्वेता लवकरच डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण करणार आहे.

आर्थिक परिस्थिती बेताची

श्वेता ही प्रयागराजच्या झलवा येथील पीपल गावातील रहिवासी आहे. तिचे डॉक्टर होण्याचे स्वप्न आहे. त्यासाठी तिने दिवसरात्र अभ्यास करुन नीट परीक्षा क्रॅक केली आहे. श्वेताची आर्थिक परिस्थिती फार चांगली नाहीये. तिची आई कुसुम देवी घरी शिलाई मशीनवर काम करते. तर वडील हीरालाल पाल हे सीट कव्हर बनवण्याचे काम करते.

मोफत सरकारी कोचिंग करुन मिळवलं यश

श्वेताने खूप मन लावून अभ्यास केला. त्याचेच यश तिला मिळाले. तिने आपल्या यशाचे श्रेय आईवडील आणि शिक्षकांना दिले आहे. तिने समाज कल्याण विभाग आणि एक्स नवोदय फाउंडेशनद्वारे मोफत कोचिंग क्लासेसमधून अभ्यास केला.

श्वेताचे वडील करतात सीट कव्हर बनवायचे काम

श्वेताचे वडील सीट कव्हर बनवायचे काम करतात. त्यांना आपल्या लेकीला महागड्या कोचिंग क्लासेसला घालण्यासाठी पैसे नव्हते. त्यामुळे कोचिंग क्लासेसमध्ये शिक्षण घेण्यासाठी श्वेताच्या वडिलांकडे पैसे नव्हते. कधीकधी तर फक्त चटणी आणि चपाती खाऊन त्यांनी दिवस काढलेत. परंतु कुटुंबाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी मेहनत घेतली आणि त्याचे यश तिला मिळाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manoj jarange patil protest live updates: मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यास सुरुवात

Latur Crime : पेट्रोल पंपावर राडा; किरकोळ कारणातून कर्मचाऱ्याला मारहाण

Pune Accident : पुण्यात भीषण अपघात; भरधाव ट्रकची दुचाकीला धडक, दोघांचा जागीच मृत्यू

मराठा आंदोलनात घुसखोरी, मध्य प्रदेशच्या तरूणाला मराठ्यांनी पकडले अन्...

Param Sundari Collection : 'परम सुंदरी'ची जादू फेल; पहिल्याच सोमवारी कमाईत घसरण, कलेक्शनचा आकडा किती?

SCROLL FOR NEXT