
बीड जिल्ह्यात मारहाणीच्या घटना थांबायचं नाव घेत नाही आहेत. चक्क संप्रदायामधील महाराज आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडून एका विद्यार्थ्याच्या पालकाला पैसे परत मागितल्यामुळे मारहाण करण्यात आली. तपभूमी येथील वारकरी संप्रदायाच्या संस्थानामध्ये ही घटना घडली. महाराजांसह पाच जणांनी पालकांना खोलीत कोंडून अमानुष मारहाण करण्यात आली. या माराहाणीमध्ये जखमी झालेल्या पालकांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी बीड ग्रामीण पोलिसात ५ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे बीडमध्ये खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील चिखली येथे ही धक्कादायक घटना घडली. मनोहर कचरू वारे यांचा मुलगा संप्रदायिक शिक्षण घेण्यासाठी बीडच्या तपभूमी वारकरी शिक्षण संस्थेत शिकण्यासाठी पाठवण्यात आला होता. यासाठी ५० हजार रुपये डोनेशनची मागणी संस्थांचे सत्यवान महाराज लाटे यांनी केली होती. त्यापैकी ३० हजार रुपये मनोहर वारे यांनी दिले होते. मात्र मुलांच्या काही अडचणीमुळे त्यांनी अॅडमिशन कॅन्सल केले.
मुलाचे अॅडमिशन कॅन्सल केल्यामुळे डोनेशनचे भरलेले पैसे परत मिळावे यासाठी त्यांनी संस्थेकडे मागमी केली. त्यांनी पैसे परत मागितले असता 'तू आम्हाला पैसे परत मागतो का? तुला जर आम्ही पैसे दिले तर आम्हाला सर्वांना पैसे द्यावे लागतील. तुला नीट परत जायचं आहे का? नाही तर तू या डोंगराच्या बाहेर सुद्धा जाणार नाहीस.' अशी धमकी त्यांना देण्यात आली. त्यानंतर संप्रदायामधील महाराज आणि त्यांचे सहकारी अशा एकूण पाच जणांनी त्यांना संस्थानातील एका खोलीमध्ये कोंडून अमानुष मारहाण केली.
मनोहर वारे यांच्या पायावरती, हातावरती आणि पाठीवरती मारहाण केल्याचे व्रण आहेत. या मारहाणीचा व्हिडिओ सध्या व्हायरल देखील होत आहे. 'महाराज आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडून माझ्या जीवितस धोका आहे. त्यांच्यावरती कडक कारवाई करावी.' अशी मागणी विद्यार्थ्याचे पालक मनोहर कचरू वारे यांनी केली आहे. त्यांच्याव सध्या बीडच्या जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.