Accident : अपघातात सर्वाधिक मृत्यू; चार महिन्यात १५७ जणांचा गेला जीव, बीड जिल्ह्यातील धक्कादायक चित्र

Beed News : बीड जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गासह राज्य महामार्ग, जिल्हा अंतर्गत रस्ते या रस्त्यांवरती अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. बऱ्याचदा चुकी नसताना देखील अपघात होऊन मृत्यूच्या घटना घडल्या
Accident
Accident Saam tv
Published On

योगेश काशीद 

बीड : सुसाट वेगाने वाहने चालवणे किंवा वाहनांवरील नियंत्रण सुटून अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे. परिणामी अपघाती मृत्यू होण्याची संख्या वाढत आहे. बीड जिल्ह्यात मागील चार महिन्याची चित्र पाहिल्यास नैसर्गिक मृत्यूपेक्षा अपघाती मृत्यू होण्याची संख्या अधिक असल्याचा धक्कादायक आकडा समोर आला आहे. कारण मागील चार महिन्यात जिल्ह्यात १५७ जणांचा अपघातात मृत्यू झाला आहे.  

बीड जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गासह राज्य महामार्ग, जिल्हा अंतर्गत रस्ते या रस्त्यांवरती अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. बऱ्याचदा चुकी नसताना देखील अपघात होऊन मृत्यू होत असल्याच्या घटना घडल्या आहेत. तर बऱ्याचदा भरधाव वेगाने वाहने चालविण्याच्या कारणातून अपघात होत आहे. यामध्ये बीड जिल्ह्यात जानेवारी ते एप्रिल २०२५ या चार महिन्यात तब्बल १५७ जणांना आपला जीव गमावावा लागला आहे.  

Accident
Amalner News : नवीन घरात जाण्याचे स्वप्न अधुरे; बांधकामावर पाणी मारायला गेला अन् मृत्यूने गाठले, कुटुंबावर दुःखाचा डोंगर

आठवड्याभरात ११ मृत्यू 

अशात गेल्या महिन्यामध्ये बीडच्या गेवराई तालुक्यातील गडी फाट्याजवळ दुसऱ्याला वाचवण्यासाठी गेलेल्या सहा तरुणांना जीव गमावा लागला. तर बीडच्या मांजरसुंबा येथेही पाच जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. एका आठवड्यामध्ये अकरा लोकांचा मृत्यू झाला आहे. चार महिन्याची आकडेवारी पाहता धक्कादायक आकडेवारी आहे. तर २०२४ मध्ये ८५६ अपघात झाले होते. यात मृतांची संख्या ४५९ आणि जखमी ३९७ लोक होते. यावरून जखमी पेक्षा मयत अधिक असल्याचे दिसत आहे.

Accident
Accident News : भरधाव कार थेट घरात घुसली; अंकलेश्वर बुऱ्हाणपूर महामार्गावर थरकाप उडविणारा अपघात

अतिवेग प्रमुख कारण 
दरम्यान वाहतुकीचे नियमांचे पालन करण्याचे आवाहन वाहतूक शाखेकडून केले जात असते. तर बीड पोलीस यंत्रणा आणि वाहतूक यंत्रणा नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवरती कारवाई केली जाते. मात्र अतिवेग आणि रात्रीचा प्रवास यामुळे अपघाताची संख्या वाढत आहे. बीड जिल्ह्यात चार महिन्यात २१९ अपघात झाले आहेत. यामध्ये १०२ जखमी झाले आहेत. तर मृतांचा आकडा १५७ एवढा आहे 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com