Success Story Saam Tv
बिझनेस

Success Story: १२ वर्षांचा संघर्ष; सतत अपयश; तरी हार नाही मानली; मेहनतीच्या जोरावर झाले SDM; राहुल सिन्हा यांचा प्रवास

Success Story of SDM Rahun Sinha: राहुल सिन्हा यांनी १२ वर्षांच्या संघर्षानंतर आपले स्वप्न पूर्ण केले. त्यांनी प्रायव्हेट नोकरी करत अभ्यास केला. शेवटी त्यांनी खूप मेहनतीने आपले स्वप्न पूर्ण केले.

Siddhi Hande

SDM राहुल सिन्हा यांचा प्रेरणादायी प्रवास

१२ वर्षांचा संघर्ष

नोकरी करताना केला स्पर्धा परीक्षेचा अभ्यास

स्पर्धा परीक्षा पास करण्याचे लाखो तरुणांचे स्वप्न असते. स्पर्धा परीक्षा पास करण्यासाठी मेहनत, जिद्द आणि सातत्य या तीन गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. जर तुम्ही सातत्य ठेवलं तर तुम्हाला नक्कीच यश मिळते. तुम्हाला आपल्या ध्येयाशी एकनिष्ठ राहावं लागतं. असंच काहीसं राहुल सिन्हा यांनी केली. त्यांना १२ वर्षाच्या संघर्षानंतर शेवटी यश मिळाले. ते सध्या SDM म्हणून कार्यरत आहेत.

राहुल सिन्हा यांना प्रवासात खूप अडचणी आल्या. तरीही त्यांनी हार मानली नाही. अनेकदा त्यांना अपयश मिळाले. परंतु त्यांनी हार मानली नाही.

दहावीत फक्त ५२ टक्के गुणे

राहुल सिन्हा हे मूळचे बिहारचे रहिवासी आहेत. त्यांचे सुरुवातीचे दिवस फार बिकट होते. त्यांना दहावीच्या परीक्षेत फक्त ५२ टक्के गुण मिळाले होते. परंतु त्यांचे पहिल्यापासूनच ऑफिसर होण्याचे स्वप्न होते. सुरुवातीला त्यांनी इंजिनियरिंग करण्याचा निर्ण घेतला होता.

राहुल सिन्हा यांनी आयआयटीमध्ये जाण्यासाठी खूप मेहनत घेतली. अभ्यास करण्यासाठी ते कोटा येथेदेखील गेले होते. त्यांनी तीनदा परीक्षा दिली होती मात्र, त्यांना अपयश मिळाले. परंतु त्यांनी हार मानली नाही. त्यांनी एका कॉलेजमधून इंजिनियरिंगचे शिक्षण पूर्ण केले. नोकरी मिळवण्यासाठी खूप प्रयत्न केले.

राहुल सिन्हा यांनी आयुष्यात खूप अपयश पचवले. त्यांची एका कंपनीत नोकरी लागली परंतु त्यांचे स्वप्न स्पर्धा परीक्षा पास करमे होते. त आपले स्वप्न कधीच विसरले नाही.

१२ वर्षांचा संघर्ष

राहुल यांनी खूप प्रयत्न केले. १२ वर्ष संघर्ष केला. परंतु त्यांनी आपले स्वप्न पूर्ण केले. त्यांनी बिहार लोकसेवा आयोगाची परीक्षा पास केली. त्यांनी BPSC परीक्षेत ९२ रँक प्राप्त केली. त्यांनी आपले एसडीएम होण्याचे स्वप्न पूर्ण केलेच. त्यांचा हा प्रवास लाखो तरुणांसाठी प्रेरणादायी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Care Fund मध्ये बॅलन्स किती?सरकारकडून आकडेवारी सार्वजनिक

श्रावण स्पेशल मालवणी स्टाईल खुसखुशीत अळूवडी; सोपी रेसिपी आजच करून पाहा!

Maharashtra News Live Update: गुहागरच्या बुधल बीचवर चिपळूणच्या दोन तरुणांचा बुडून मृत्यू

Social media workouts: सोशल मीडियावरचे हे फिटनेस ट्रेंड फॉलो करताय? ही चूक करू नका, मणक्याला होऊ शकते गंभीर इजा

Maharashtra Freedom of Religion Act : धर्म स्वातंत्र्य कायदा रक्षाबंधनापासून लागू, राजपत्रात अधिसूचना प्रसिद्ध

SCROLL FOR NEXT