Success Story Saam Tv
बिझनेस

Success Story: वडील मजूरी करायचे, लेकाने क्रॅक केली UPSC; पुलवाम्यातील पहिले IAS तौसीफ अहमद गनी यांचा प्रवास

Success Story of Pulwama IAS Tawseef Ahmed Ganie: तौसीफ अहमद गनी यांनी तिसऱ्या प्रयत्नात यूपीएससी परीक्षा पास केली आहे. त्यांची आर्थिक परिस्थिती फार बेताची होती. तरीही त्यांनी सिविल सर्व्हिसमध्ये जाण्याचे स्वप्न पाहिले आणि ते पूर्णदेखील केले.

Siddhi Hande

IAS तौसीफ अहमद गनी यांचा प्रवास

पुलवाम्यातील पहिले आयएएस अधिकारी

वडिलांसाठी यूपीएससी परीक्षा केली पास

काश्मीरमधील पुलवामा येथील हल्ला तर सर्वांनाच आठवत असेल. १४ फेब्रुवारी २०१९ हा देशासाठी काळा दिवस होता. या हल्ल्यात जवळपास ४० सैनिक शहीद झाले होते. या घटनेनंतर पुलवामा खूप चर्चेत आले आहे. दरम्यान, आता पुलवामा येथील एका तरुणाने यूपीएससी परीक्षा पास केली आहे. पुलवामा येथून देशाला एक नवीन तडफदार आयएएस अधिकारी मिळाले आहेत. तौसीफ अहमद गनी यांनी यूपीएससी परीक्षा पास करुन हा मान मिळवला आहे. ते पुलवामा येथील पहिले आयएएस अधिकारी आहेत.

तौसीफ अहमद गनी पुलवामातील पहिले IAS अधिकारी

तौसीफ अहमद गनी हे मूळचे पुलवामा येथील पुचल गावचे रहिवासी आहेत. त्यांनी आर्थिक परिस्थिती खूप बेताची होती. परंतु तरीही त्यांनी हार मानली नाही. अभ्यासाच्या जोरावर त्यांनी यूपीएससी परीक्षा पास केली आहे. तौसीफ यांनी वडील मोहम्मद इशाक रोजंदारीवर काम करतात. त्यांनी आपल्या मुलांच्या स्वप्नांसाठी खूप मेहनत घेतली. त्यांना कधीच काहीच कमी पडू दिले नाही.

तौसीफ यांचे वडील इशाक यांनी खूप कमी वयात काम करण्यास सुरुवात केली. त्यामुळे तौसीफ यांना परिस्थितीची जाणीव होती. जम्मू काश्मीरमधील १७ उमेदवारांनी यूपीएससी परीक्षा पास केली. त्यातील एक तौसीफ आहेत.

तौसीफ यांनी खूप कमी वयातच सिविल सर्व्हिसमध्ये जाण्याचे ठरवले होते. त्यांनी २०२२ मध्ये पशु चिकित्सा विज्ञान विषयात पदवी प्राप्त केली. परंतु त्यांचे यूपीएससी परीक्षा पास करण्याचे स्वप्न होते. त्यामुळे त्यांनी अभ्यास केला.

२०२२ मध्ये कॉलेज संपल्यावर त्यांनी यूपीएससी परीक्षा पास केली. परंतु त्यांना अपयश मिळाले. २०२४ मध्ये पुन्हा एकदा त्यांना अपयश मिळाले.परंतु त्यांनी हार मानली नाही. तौसीफ यांनी यूपीएससी परीक्षेची तयारी करण्यासाठी दिल्ली गाठली. त्यांनी खूप मेहनत घेतली आणि यूपीएससी परीक्षा पास केली.

वेटरनरी सायन्समध्ये पदवी प्राप्त केल्यानंतर त्यांना सरकारी नोकरी मिळाली होती. परंतु तरीही त्यांनी यूपीएससी परीक्षा पास करण्याचा निर्धार केला. तिसऱ्या प्रयत्नात त्यांनी यूपीएससी परीक्षा पास केली २५४ रँक प्राप्त केली. त्यांच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : सहावीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर ॲसिड हल्ला प्रकरणी आज रास्तारोको आंदोलन

निवडणुकांपूर्वी काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का, खासदाराचा तडकाफडकी राजीनामा

Nachni Idli Recipe: नाचणीची मऊसूत इडली कशी बनवायची? या सोप्या स्टेप्स करा फॉलो

Pune Crime: पुणे हादरले! स्नूकर खेळताना खुन्नस दिली, रागाच्या भरात तरुणांनी मित्रालाच संपवलं

पुण्यात सहावीतील विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू; पालकांमध्ये भीतीचं वातावरण

SCROLL FOR NEXT