Success Story Saam Tv
बिझनेस

Success Story : वय नावाला असते! बँकेतील नोकरी सोडली अन् ५० व्या वर्षी व्यावसाय उभारला, NYKAA च्या फाल्गुनी नायर यांची यशोगाथा वाचाच

Nykaa Owner Falguni Nayar Success Story: २० वर्षे बँकेत नोकरी करुनदेखील स्वतः चा व्यवसाय सुरु करण्याचे स्वप्न सत्यात उतरवले. फाल्गुनी नायर यांनी वयाच्या ५० व्या वर्षी स्वतः चा व्यवसाय सुरु केला.

Siddhi Hande

आयुष्यात यशस्वी होण्यासाठी मेहनत आणि इच्छाशक्ती खूप महत्त्वाची असते. तुम्ही कोणत्याही वयात यश हे मिळवू शकतात. जर तुम्हाला कष्ट करायचे असतील स्वतः ची स्वप्न पूर्ण करायची असतील तर तुमचे वय कितीही असू दे काहीच फरक पडत नाही. असंच यश फाल्गुनी नायर यांनी मिळवलं आहे. फाल्गुनी नायर या नायका या ब्रँडची मालकीण आहे. नायका या कंपनीची किंमत कोट्यवधींच्या घरात आहे.

नायका कंपनीच्या मालकीण फाल्गुनी नायर यांनी वयाच्या ५० व्या वर्षी स्वतः चा व्यवसाय सुरु केला.फाल्गुनी यांनी आपले स्वप्न सत्यात उतरवले आणि कोट्यवधींचा व्यवसाय उभा केला. (Nykaa success story)

फाल्गुनी नायर यांचा जन्म १९ फेब्रुवारी १९६३ मध्ये झाला. त्या एक इन्व्हेस्टमेंट बँकर होत्या. त्यांनी एएफ फर्ग्यूसन कंपनीत मॅनेजमेंट कंसल्टंट म्हणून काम केले. त्यानंतर कोटक महिंद्रा बँकेत नोकरी करेली. त्या २००५ साली बँकेत मॅनेजमेंट डायरेक्टर बनल्या. १९ वर्ष त्यांनी बँकेत नोकरी केली. याच काळात त्यांनी आयआयएम अहमदाबाद येथून एमबीए केले. याच काळात त्यांनी स्वतः चा व्यवसाय सुरु करण्याचे ठरवले.

वयाच्या ५० व्या वर्षी फाल्गुनी नायर यांनी स्वतः चा व्यवसाय सुरु केली. आपली लाखोंच्या पगाराची नोकरी सोडून बिझनेस सुरु करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी नायका नावाची कंपनी सुरु केली . नायका म्हणजे प्रमुख भूमिका निभावणारी अभिनेत्री. त्यामुळेच त्यांनी स्त्रियांच्या सुंदरतेला अजून सुंदर बनवण्यासाठी २०१२ साली ब्यूटी वेलनेस प्रोडक्ट विकण्यासाठी ऑनलाइन प्लॅटफॉर्म सुरु केली.

फाल्गुनी यांनी २०१५ मध्ये आपले ऑफलााइन स्टोरदेखील सुरु केली. त्यानंतर त्यांचा नफा अजूनच वाढला. देशभरात त्यांचे ६८ स्टोर आहेत.आज ही कंपनी १३ बिलियनची आहे. (Falguni Nayar success Story)

फाल्गुनी यांनी २०१५ मध्ये आपले ऑफलााइन स्टोरदेखील सुरु केली. त्यानंतर त्यांचा नफा अजूनच वाढला. देशभरात त्यांचे ६८ स्टोर आहेत.आज ही कंपनी १३ बिलियनची आहे. २० वर्ष बँकेत नोकरी करुनदेखील त्यांनी त्यांचे स्वप्न पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आणि ते स्वप्न पूर्ण केले. यामुळे व्यवसाय सुरु करण्यासाठी आणि स्वप्न पाहण्यासाठी कोणतीही वयोमर्यादा नसते, याचं उत्तम उदाहरण फाल्गुनी नायर आहेत. (Nykaa Owner Falguni Nayar Success Story)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Salman- Shah Rukh Movie: 'मेरे करन अर्जुन आएंगे...' सलमान अन् शाहरूखची जोडी पुन्हा झळकणार

Census Of India: जनगणनेसंदर्भात मोठी अपडेट, २०२५ पासून होणार प्रक्रिया सुरू, कधीपर्यंत मिळणार अहवाल?

Radha Yadav Catch: ही राधा 'बावरी' नायतर 'सुपरवुमन' हाय! हवेत झेपावत घेतला अफलातून कॅच - VIDEO

Diwali 2024: दिवाळीला गणपती आणि लक्ष्मीची मूर्ती कोणत्या दिशेला ठेवावी? घरात येईल सुख-समृद्धी

Maharashtra News Live Updates : चंदगड विधानसभा मतदारसंघात बंडखोरी; भाजप नेते शिवाजी पाटील यांनी भरला अपक्ष उमेदवारी अर्ज

SCROLL FOR NEXT