Success Story Saam Tv
बिझनेस

Success Story: IIM मधून MBA, लाखो रुपयांची नोकरी सोडली, दुसऱ्या प्रयत्नात क्रॅक केली UPSC; महाराष्ट्राच्या लेकीची यशोगाथा वाचा

Success Story Of IAS Neha Bhosale: आयएएस नेहा भोसले यांनी दुसऱ्या प्रयत्नात यूपीएससी परीक्षा क्रॅक केली. स्पर्धा परीक्षा देण्यासाठी त्यांनी लाखो रुपयांच्या पॅकेजची नोकरी सोडली.

Siddhi Hande

यूपीएससी ही देशातील सर्वात अवघड परीक्षा आहे. या परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात यश मिळत नाही. परंतु यश मिळाले नाही म्हणून खचून जायचे नाही. तसेच आपण आयुष्यात काहीतरी वेगळच ठरवतो पण वेगळंच होतं. असंच आयएएस नेहा भोसले यांच्यासोबत झालं.

नेहा भोसले यांचा जन्म मुंबईचा. मुंबईतच त्यांचे बालपण गेले. त्यांना लहानपणापासूनच इंग्लंडला शिफ्ट व्हायचे होते. त्यांनी Enid Blytonची मिस्ट्री सीरीज वाचली होती. तेव्हापासून त्यांना इंग्लंडला जायचे स्वप्न होते.परंतु त्यांच्या नशीबात काहीतरी वेगळंच लिहलं होतं. त्यांनी यूपीएससी (UPSC) परीक्षा दिली.

नेहा भोसले (IAS Neha Bhosale) यांना डेटेक्टिव्ह, आर्कियोलॉजिल्ट,वकील किंवा नॉवेलिस्ट बनायचे होते. त्या लहानपणापासूनच हुशार होते. त्यांना अमेरिकेला जायचे होते. त्यामुळे त्यांनी इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजीमध्ये बीटेकचे शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी एमबीए करण्याचा निर्णय घेतला.

त्यांनी कॅट परीक्षेत खूप चांगले गुण मिळाले होते. त्यांनी आयआयएम लखनऊमधून एमबीए केले. त्यानंतर त्यांनी नोकरी सुरु केली. त्याचवेळी यूपीएससी परीक्षेचा निकाल लागला. यावेळ लखनऊचे गौरव अग्रवाल यांनी टॉप केले होते. यातूनच त्यांना प्रेरणा मिळाली.

यानंतर त्यांनी GMAT परीक्षा दिली. जिमॅट परीक्षेत त्यांनी चांले गुण मिळवले. त्यांना मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटमध्ये अॅडमिशनसाठी ऑफरदेखील आले होते.मात्र, त्यांनी यूपीएससी परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. जीमॅटची परीक्षा दिल्यानंतर त्या चांगल्या कॉलेजमधून एमबीए करु शकत होत्या. मात्र, त्यांनी यूपीएससी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या प्रयत्नात त्यांना अपयश मिळाले. त्यामुळे त्यांनी नोकरी सोडली आणि यूपीएससी परीक्षेची तयारी सुरु केली.

नेहा यांनी २०१९ मध्ये यूपीएससी परीक्षेत १५वी रँक मिळवली. त्यांनी लाखो रुपयांची नोकरी सोडून स्पर्धा परीक्षा देण्याचा निर्णय घेतला आणि त्यात यशदेखील मिळवले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : तोडा-फोडा राज्य करा, ही यांची निती - ठाकरे

Spiritual Shells: पैशाचा पाऊस पाडणारी कौरीची शेल कशी तयार होते? याचे महत्त्व काय आहे?

Dhule Tourism : वीकेंडसाठी धुळे परफेक्ट लोकेशन, 'ही' ३ ठिकाणं पाहताच आठवड्याचा थकवा जाईल पळून

Maharashtra Live News Update: विठ्ठल रुक्मिणी मंदिर फुलांनी सजले

Metro In Dino Cast Fees: रोमँटिक म्युझिकल ड्रामा 'मेट्रो इन डिनो' चित्रपटातील कलाकारांचे मानधन किती?

SCROLL FOR NEXT