Nashik Crime : एमबीए झालेल्या महिलेने केली बाळाची चोरी, कारण ऐकून पोलीसही चक्रावले

Nashik hospital Theft News : नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात सुमन खान या महिलेने एका बाळाला जन्म दिला. हे बाळ चोरीला गेले. अवघ्या १२ तासांमध्ये पोलिसांनी बाळ शोधून आईकडे सुपूर्त केले.
Nashik hospital Theft News
Nashik hospital Theft NewsSaam Tv (Youtube)
Published On

भरत मोहळकर (साम टीव्ही)

Nashik Crime : एमबीए झालेल्या महिलेने चक्क बाळाची चोरी केल्याची घटना घडली आहे. बाळ चोरी केलेल्या सपना मराठे या महिलेला नाशिक पोलिसांनी अटक केली आणि चौकशी दरम्यान चक्रावणारी माहिती समोर आली आहे.. नाशिकमध्ये नेमकं काय घडलं आणि महिलेने बाळाची चोरी का केली? त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट

देशभरात नवजात बाळांच्या चोरीच्या घटना वारंवार घडतात. अशीच एक घटना नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात घडली. सटाण्याच्या सुमन खान या महिलेचं सीजर झालं आणि तिने एका गोंडस बाळाला जन्म दिला.. मात्र हेच बाळ चोरीला गेलं आणि एकच खळबळ उडाली. पोटचा गोळा चोरीला गेला म्हणून चिमुकल्याच्या आईने हंबरडा फोडला. या प्रकरणी पोलीसात तक्रार देण्यात आली आणि पोलिसांनी तपासाची चक्रं वेगाने फिरवून नवजात बालकाला अवघ्या १२ तासात शोधून आईच्या कुशीत परत दिलं. मात्र चौकशीदरम्यान बाळाची चोरी केलेल्या सपना मराठे या महिलेने बाळाची चोरी का केली? याचं कारण सांगितलं आणि कारण ऐकून पोलिसही चक्रावून गेले.

Nashik hospital Theft News
UP Crime : माथेफिरू बॉयफ्रेंडचं धक्कादायक कृत्य; भर रस्त्यात गर्लफ्रेंडचा हत्येचा प्रयत्न, VIDEO

वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी दिलेल्या माहितीनुसार, सपना मराठे ही एमबीए झालेली उच्चशिक्षित महिला आहे. तिचा सलग दोन वेळा गर्भपात झाला. त्यानंतर मूल होत नसल्याने सपनाने गरोदर असल्याचा बनाव केला. त्यानंतर तब्बल ९ महिने घरापासून लांब राहिली आणि २ दिवसांपूर्वी या महिलेने प्रस्तुती झाल्याचं घरी सांगितलं.. मात्र सपनाच्या बापाला संशय आला आणि सपनाचं बिंग फुटलं.

नाशिकच्या जिल्हा रुग्णालयातून यापूर्वीही अशा घटना घडल्या आहेत. त्यामुळे रुग्णालय प्रशासनाने अशा घटना रोखण्यासाठी ठोस पावलं उचलण्याची गरज असल्याचे म्हटले जात आहे.

Nashik hospital Theft News
Surat News : ऑन ड्युटी CISF जवान किसनसिंग बाथरुममध्ये गेला अन्..., पुढे जे घडलं ते पाहून विमानतळावरील सगळेच हादरले!

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com