Success Story Saam Tv
बिझनेस

Success Story: अमेरिकेतील नोकरी सोडली, घरी बनवून विकले पौष्टिक लाडू; आज कमावतो ५५ लाख रुपये; वाचा सक्सेस स्टोरी

Success Story Of Sandeep Jogiprati: संदीप जोगीपर्ती यांनी अमेरिकेतील लाखो रुपयांच्या पगाराची नोकरी सोडली अन् स्वतः चा स्टार्टअप सुरु केला. त्यांनी लड्डूबॉक्स नावाची कंपनी सुरु केली.

Siddhi Hande

आयुष्यात कधीकधी काही निर्णय आपलं पूर्ण आयुष्यच बदलून टाकतात. सर्वकाही सुरळीत सुरु असताना आपण अचानक काही निर्णय घेतो. असाच निर्णय हैदराबादच्या संदीप जोगीपर्ती यांनी घेतला आणि स्वतः चा बिझनेस सुरु केला. या व्यवसायात यश मिळेल की नाही याची शाश्वती नसतानाही त्यांनी हा निर्णय घेतला आणि हा निर्णय योग्य आहे हे दाखवून देण्यासाठी दिवसरात्र मेहनत केली. संदीप जोगीपर्ती यांनी लड्डूबॉक्स नावाचा स्टार्टअप सुरु केला. आज या कंपनीची किंमत कोट्यवधी रुपये आहे.

संदीप जोगीपर्ती हे सॉफ्टवेअर इंजिनियर होते. त्यांनी अमेरिकेतली नोकरी सोडून व्यवसाय सुरु केला. ते गूळ आणि खजूरचा वापर करुन लाडू बनवतात. २०१९ मध्ये या व्यवसायाची सुरुवात केली. २०२२ मध्ये त्यांनी स्वतः चे ऑफलाइन स्टोअर सुरु केले. आज या कंपनीने वेगळीच उंची गाठली आहे.

संदीप जोगीपर्ती सॉप्टवेअर इंजिनियर होते. ते अमेरिकेतली एका कंपनीत कामाला होते. सर्वकाही चांगलं सुरु असतानाही त्यांनी आपले स्वप्न पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. २०१८ मध्ये ते आपली पत्नी कविता गोपी यांच्यासोबत हैदराबादला परत आले. त्यांनी अमेरिकेत नोकरी सोडली तेव्हा सर्वांनाच धक्का बसला होता. २०१९ मध्ये त्यांनी लड्डूबॉक्स नावाचा स्टार्टअप सुरु केला. ही कंपनी हेल्दी लाडू बनवते.

आयडिया

संदीप यांना जेवताना काहीतरी गोड खाण्याची सवय आहे. एक दिवशी त्यांच्या घरच्यांनी त्यांना साखर सोडून गूळ खाण्यास सांगितले. तेव्हाच त्यांच्या डोक्यात आयडीया आली की आपण साखर सोडून गुळापासून लाडू बनवले तर किती चांगले होईल. कोणीही न घाबरता हे लाडू खाऊ शकतात. या कामात त्यांच्या पत्नीने त्यांची खूप साथ दिली.

लड्डूबॉक्समध्ये अनेक प्रकारचे लाडू असतात. यात उडीद डाळ, नारळ, मल्टीग्रेन, बाजरी आणि नाचणीपासून बनलेल्या लाडूंचा समावेश आहे. याची किंमत २५० रुपयांपासून सुरु होते. या लाडूंची डिलिव्हरी संपूर्ण देशभरात होते.

कोरोनमध्ये त्यांचा बिझनेस थोडा मंदीत सुरु होता. परंतु त्यानंतर त्यांनी ऑनलाइन ऑर्डर घेण्यास सुरुवात केली. पती पत्नीने सुरु केलेला हा व्यवसाय खूप मोठा झाला आहे. लड्डूबॉक्सची वार्षिक कमाई जवळपास ५५ लाख रुपये आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: धाराशिव जिल्ह्यात नगरपरिषद मतदार यादीत घोळ

Pune Police: पुण्यात १७ पोलिस निरीक्षकांच्या बदल्या, कुणाची कुठे झाली बदली? वाचा संपूर्ण लिस्ट

Tridashansh Yog: अवघ्या काही तासांनी गुरु-बुध तयार करणार त्रिदशांश योग; 'या' राशींच्या नशीबी येणार अखेर श्रीमंती

Jalna News: मोठी बातमी! महानगरपालिकेच्या आयुक्तांना १० लाखांची लाच घेताना अटक

Bjp vs Shivsena: दिवाळीआधीच महायुतीत वादाचे फटाके, 'ठाण्यात भाजपचा महापौर होणार' भाजपचा स्वबळाचा नारा

SCROLL FOR NEXT