Shreya Maskar
सुकं खोबऱ्याचे लाडू बनवण्यासाठी काजू, बदाम, मनुके, खजूर, तूप, गूळ आणि वेलची पावडर इत्यादी साहित्य लागते.
सुकं खोबऱ्याचे लाडू बनवण्यासाठी सर्वप्रथम सुकं खोबर बारीक किसून घ्या.
त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात काजू, बदाम, खजूर टाकून बारीक वाटून घ्या.
आता खोबऱ्याच्या मिश्रणामध्ये बारीक वाटलेले काजू , बदाम टाकून छान मिक्स करून घ्या.
आता या मिश्रणात गूळ टाकून सर्व छान एकजीव करून घ्या.
शेवटी यात वेलची पावडर टाका.
हाताला तूप लावून छोटे छोटे लाडू वळून घ्या.
नियमित सुकं खोबऱ्याचे लाडू खाल्ल्यामुळे हाडांचे दुखणे कमी होते.