Success Story Saam Tv
बिझनेस

Success Story: जम्मू काश्मीरमधील पहिल्या महिला IPS, पुन्हा UPSC क्रॅक; IAS रुवेदा सलाम यांचा प्रवास

Success Story of IAS Ruveda Salam: आयएएस रुवेदा सलाम एकदा नव्हे तर दोनदा स्पर्धा परीक्षा पास केली आहे. पहिल्या प्रयत्नात त्या आयपीएस अधिकारी झाल्या. त्यानंतर त्यांनी पुन्हा यूपीएससी परीक्षा पास केली.

Siddhi Hande

जम्मू काश्मीरमधील पहिल्या महिला IPS अधिकारी

रुवेदा सलाम यांनी दोनदा केल्या स्पर्धा परीक्षा क्रॅक

पुन्हा केली UPSC क्रॅक

आयुष्यात यशस्वी होण्यासाठी मेहनत आणि इच्छाशक्ती खूप महत्त्वाची असते. तुम्ही जर दृढ संकल्प केला तर कोणतेही काम करु शकतात. तुमच्याकडे फक्त काम करण्याची इच्छा असायला हवी. असंच काहीसं आयएएस रुवेदा सलाम यांच्यासोबत झालं. त्यांनी एकदा नव्हे तर दोनदा यूपीएससी परीक्षा पास केला.

काश्मीरमधील पहिल्या महिला आयपीएस अधिकारी (Kashmir First Women IPS Officer Ruveda Salam)

रुवेदा सलाम यांनी इतिहास रचला आहे. त्या जम्मू काश्मीरमधील पहिल्या महिला आयपीएस अधिकारी आहेत. त्यानंतर त्यांनी चेन्नई एक वर्षभर सहायक पोलिस आयुक्त म्हणून काम केले. यानंतर त्यांनी पुन्हा यूपीएससी परीक्षा दिली आणि आपले आयएएस बनण्याचे स्वप्न पूर्ण केले.

रुवेदा यांचा प्रवास (Ruveda Salam Inspirational Journey)

रुवेदा यांनी कोणत्याही कोचिंग क्लासेसशिवाय दोनदा यूपीएससी (UPSC) परीक्षा पास केली आहे. त्यांना वर्तमानपत्र आणि स्टडी मटेरियलदेखील खूप कमी मिळायचे. तरीही त्यांना हार मानली नाही. त्या शेवटी आयएएस अधिकारी बनल्या.

रुवेदा यांना त्यांच्या वडिलांकडून प्रेरणा मिळाली होती.त्यांनी आयएएस होण्याचे स्वप्न पूर्ण केले. याचसोबत रुवेदा यांना लग्न करायचे नाही या निर्णयालाही त्यांच्या कुटुंबाने सपोर्ट केला. त्यांना त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मदत केली.

रुवेदा यांचे शिक्षण (IAS Ruveda Salam Education)

रुवेदा यांनी २००९ मध्ये सरकारी मेडिकल कॉलेज श्रीनगरमधून पदवी प्राप्त केली. त्यांनी एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण केले. यानंतर त्या इंटर्न म्हणून काम करत होत्या. त्याच काळात त्यांनी जम्मू काश्मीर लोकसेवा आयोगाची परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. त्यांना या परीक्षेत २५वी रँक प्राप्त केली. परंतु नंतर त्यांनी यूपीएससी परीक्षा देण्यासाठी नोकरीचा राजीनामा दिला.

२०१३ मध्ये डॉ. रुवेदा यांनी पहिल्यांदा यूपीएससी परीक्षा पास केली आणि त्या आयपीएस अधिकारी बनल्या. परंतु त्यांचे आयएएस होण्याचे स्वप्न होते. त्यामुळे त्यांनी पुन्हा २०१५ मध्ये यूपीएससी परीक्षा दिली. त्यानंतर त्या आयएएस अधिकारी झाल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Children's Day 2025 Speech: मुलांना मराठीत लिहून द्या बालदिनानिमित्त भाषण; टाळ्यांच्या कडकडाटा होईल कौतुक

Maharashtra Live News Update: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणात अभियंत्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला

Pune Accident: पुण्यात अपघाताचा थरार! नवले पुलाजवळ भरधाव कंटेनरने अनेक वाहनांना उडवलं, ४ जणांचा मृत्यू

Black Dark Lips: ओठांवरचा काळपटपणा कसा दूर कराल? या जादुई टिप्स वाचा

काँग्रेस उमेदवाराची कमाल, डिपॉझिट म्हणून चिल्लर भरली; निवडणूक अधिकारीही चक्रावले|VIDEO

SCROLL FOR NEXT