Success Story Saam Tv
बिझनेस

Success Story: चालताना अडचणी, नीट बोलता येत नव्हते, दिव्यांग असूनही क्रॅक केली UPSC; IRS मानवेंद्र सिंह यांचा प्रवास

Success Story of IRS Manvendra Singh: मानवेंद्र सिंह यांनी यूपीएससी परीक्षा पास केली आहे. दिव्यांग असूनही त्यांनी खूप मेहनतीने ही परीक्षा पास केली. त्यानी आयआयटी पाटनामधून इंजिनियरिंग केले.

Siddhi Hande

मानवेंद्र सिंह यांचा प्रेरणादायी प्रवास

दिव्यांग असूनही पास केली UPSC

IIT मधून इंजिनियरिंग अन् नंतर यूपीएससी दिली

प्रत्येकाची काही न काही स्वप्ने असतात. स्वप्न पूर्ण करण्यासाठी दिवसरात्र मेहनत करावी लागते. परंतु अनेकदा परिस्थिती आपल्या बाजूने नसते. परंतु आपण परिस्थितीवर मात करायला हवी. असंच काहीसं मानवेंद्र सिंह यांच्यासोबत झालं. ते दिव्यांग असूनही त्यांनी यूपीएससी परीक्षा पास केली.

केंद्रीय लोक सेवा आयोग ही सर्वात अवघड परीक्षा आहे. मानवेंद्र सिंह हे बुलंदरशहरचे रहिवासी आहेत. त्यांनी खूप मेहनतीने ही परीक्षा पास केली.

मानवेंद्र यांच्यासाठी हा प्रवास सोपा नव्हता. त्यांना या प्रवासात खूप अडचणी आल्या. परंतु त्यांनी हार मानली नाही. मानवेंद्र यांच्या आईने सांगितले की, मानवेंद्र यांना लहानपणापासूनच चालण्याफिरण्यासाठी अडचणी येत होत्या. त्यांना नीट बोलतादेखील येत नव्हते.

मानवेंद्र यांना सर्व गोष्टी नीट समजत होत्या. परंतु त्यांचे शारीरिक शरीर त्यांना साथ देत नव्हते. परंतु त्यांना मानसिक आरोग्यावर लक्ष दिले. त्यांच्या आयक्यू आणि इंटेलिंजेंसवर काम सुरु लागते. मानवेंद्र दहावीत होते तेव्हा त्यांना खूप चांगले गुण मिळाले. तेव्हा त्यांच्या कुटुंबियांना समजले की, मानवेंद्र खूप हुशार आहेत. त्यानंतर त्यांनी १२वीत जेईई परीक्षा दिली. तेव्हा त्यांना ६३ रँक मिळाली. २०२४ मध्ये त्यांनी आयआयटी पाटना येथून बीटेकचे शिक्षण पूर्ण केले.

मानवेंद्र यांच्या वडिलांचे अचानक निधन झाले.त्यावेळी त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. परंतु त्यांच्या आईने सर्व परिस्थिती सांभाळली. त्यांनी मानवेंद्र यांना अभ्यासासाठी प्रोत्साहन दिले. त्यांनी भारतीय इंजिनियरिंग सेवा परीक्षेत ११२ रँक प्राप्त केली. ते आता IES ऑफिसर झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्यात काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना एकत्र लढण्याचा प्रस्ताव

PM Kisan Yojana : फेब्रुवारी की मार्च? पीएम किसानचा २२वा हप्ता कधी येणार? नवीन अपडेट आली समोर

आज कोणाचं नशीब उघडणार? जाणून घ्या 26 डिसेंबर पंचांग आणि लकी राशींची यादी

Kalyan - Dombivli : कल्याण डोंबिवलीत महायुतीचा तिढा सुटणार का? शिवसेना-भाजपनं १३ नेत्यांना दिली मोठी जबाबदारी

Heart Attack in Winter : हाडं गोठवणाऱ्या थंडीमुळे हार्ट अटॅक, ब्रेन स्ट्रोकचा धोका, या शहरात १०० जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT