Success Story Saam Tv
बिझनेस

Success Story: लोकांनी टोमणे मारले; LLB करताना दिली UPSC; आज पुण्यात ऑफिसर; IPS तेजस्वी सातपुते यांचा प्रवास

Success Story of IPS Tejaswi Satpute: आयपीएस तेजस्वी सातपुते यांनी यूपीएससी परीक्षा पास करुन आयपीएस पदाला गवसणी घातली. त्या २०१२ च्या महाराष्ट्र कॅडरच्या आयपीएस अधिकारी आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

IPS तेजस्वी सातपुते यांचा प्रेरणादायी प्रवास

एलएलबी करता करता दिली यूपीएससी

अहिल्यानगरच्या लेकीची यशोगाथा

यूपीएससी ही सर्वात कठीण परीक्षांपैकी एक आहे. यूपीएससी परीक्षा देऊन प्रशासकीय सेवेत काम करण्याची संधी मिळते. दरम्यान, यूपीएससी परीक्षा पास करण्यासाठी खूप मेहनत करावी लागते. दिवसरात्र अभ्यास करावा लागतो. अनेकदा यूपीएससी परीक्षेत अपयश येते. परंतु अपयश ही यशाची पहिली पायरी असते. काहीजण पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी परीक्षा पास करतात. असंच काहीसं तेजस्वी सातपुते यांच्यासोबत झालं. त्या आज आयपीएस अधिकारी म्हणून कार्यरत

एलएलबीनंतर दिली यूपीएससी परीक्षा

तेजस्वी या मूळच्या अहिल्यानगरच्या शेवगावच्या रहिवासी आहेत. त्यांची आई शिक्षक तर वडील शेती करतात. तेजस्वी लहान होत्या तेव्हा त्यांना पायलट व्हायचे होते. परंतु काही गोष्टींमुळे त्यांना पायलट होता आले नाही.

१०-१२वीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी बायोटेक्नोलॉजीमध्ये शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी एलएलबीचे शिक्षण घेतले. याचदरम्यान त्यांना यूपीएससी परीक्षेबाबत समजले. त्यांनी आपल्या मित्रांना विचारले. यानंतर त्यांनी मित्रांसोबत परीक्षेची तयारी सुरु केली.

लोकांचे टोमणे ऐकले, तरीही हार मानली नाही

तेजस्वी यांनी तिसऱ्यांदा फील्ड बदलली होती. पहिल्यांदा बायोटेक्नोलॉजी, त्यानंतर एलएलबी आणि नंतर यूपीएससी यामुळे त्यांना अनेक टोमणे ऐकून घ्यावे लागले. एकाही फील्डमध्ये चांगलं काम करु शकत नाही, असं बोलत लोकांनी हिणवलं. परंतु तरीही त्यांनी हार मानली नाही. त्यांनी या गोष्टीकडे दुर्लक्ष केले.

एलएलबी करत असतानाच तेजस्वी यांनी पहिल्यांदा यूपीएससी परीक्षा दिली. त्यांना अपयश आले. परंतु त्यांनी हार मानली नाही. त्यांनी मुंबईला जाऊन अभ्यास करण्याचे ठरवले. एका वर्षासाठी त्यांनी खूप अभ्यास केला. २०१२ मध्ये त्यांना यूपीएससी परीक्षेत १९८ रँक मिळाली. त्या २०१२च्या महाराष्ट्र कॅडरच्या आयपीएस अधिकारी आहेत. त्यांची नुकतीच पुणे क्राइम ब्रँच येथे अतिरिक्त पोलिस आयुक्त म्हणून बदली करण्यात आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पुण्यात पाणीकपातीचे संकेत

Chanakya Niti: इतरांच्या गुणांची कदर न करणारे लोक कधीच जिंकत नाहीत, चाणक्यांचा खास सल्ला

'बाबा, हा शेवटचा कॉल, यापुढे...; भरस्त्यात मुलीनं चापट मारणं जिव्हारी लागलं, तरुणानं लिंबाच्या झाडाजवळ जीवन संपवलं!

Pandharpur Vitthal Temple: विठ्ठल दर्शनाचा काळा बाजार आला समोर; कथित ऑडिओ क्लिप व्हायरल

पाकिस्तान भूगोलात राहायचं की इतिहासात? लष्करप्रमुखांचा शेजारील देशाला इशारा

SCROLL FOR NEXT