Success Story Saam Tv
बिझनेस

Success Story: शाळेसाठी दररोज ६ किमी पायपीट; शेतातही केले काम; IPS सरोज कुमारी यांचा प्रवास

Success Story of IPS Saroj Kumari: आयपीएस सरोज कुमारी यांचा प्रवास सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे. त्यांनी रोज शाळेशाठी ६ किलोमीटर पायपीट केली. त्यानंतर शिक्षण घेतले.

Siddhi Hande

स्वप्न जर सत्यात उतरवायची असतील तर फक्त मेहनत हा एकच पर्याय आहे. तुम्ही मेहनत, इच्छाशक्ती आणि हिम्मतीच्या जोरावर यश मिळवू शकतात. असंच काहीसं सरोज कुमारी यांनी केलं. त्यांचे बालपण खूप खडतर परिस्थितीत गेले. काही मुलभूत सुविधादेखील त्यांना मिळत नव्हत्या. परंतु अशा परिस्थितीतदेखील त्यांनी आपले प्रयत्न सुरु ठेवले.याचेच त्यांना यश मिळाले आणि त्या आज आयपीएस म्हणून कार्यरत आहेत.

सरोज कुमारी यांचा प्रवास (IPS Saroj Kumari Successful Journey)

सरोज कुमारी यांचा जन्म राजस्थानमधील झुंझनू जिल्ह्यातील एका गावात झाला. त्यांची आर्थिक परिस्थिती खूप बिकट होती. लहानपणी कुटुंबाला हातभार लावण्यासाठी त्या स्वतः शेतीच्या कामात मदत करायच्या. सरोज यांनी ८वीपर्यंतचे शिक्षण सरकारी शाळेत घेतले.

शाळेसाठी रोज ६ किमीचा प्रवास

सरोज यांना गावात ८वीनंतर शिक्षण घेणे शक्य नव्हते. त्यानंतर त्यांनी अलीपूरच्या सरकारी शाळेत अॅडमिशन घेतले. त्यांची शाळा ही गावापासून ६ किमी लांब होती. तिथे जाण्यासाठी त्यांच्याकडे कोणतेही साधन नव्हते. यामुळे त्या रोज ६ किलोमीटर चालत जायच्या. एवढा संघर्ष असतानाही त्यांनी १२वीच्या परीक्षेत टॉप केले.

सरोज या लहानपणापासूनच अभ्यासात हुशार होत्या. १२वीत टॉपर झाल्यानंतर त्यांनी जयपुरमधील महारानी कॉलेजमध्ये अॅडमिशन घेतले. यानंतर त्यांनी आर्ट्समध्ये ग्रॅज्युएशन केले. एम.ए मध्ये फर्स्ट डिविजन प्राप्त केल्यानंतर त्यांनी एम.फिल केले. एम.फिलमध्ये त्यांनी टॉप केले. त्यानंतर त्या लेक्चरर बनल्या. परंतु त्यांना सिविल सर्व्हिसमध्ये कार्यरत व्हायचे होते. त्यामुळे त्यांनी यूपीएससी परीक्षा देण्याचा निर्णय घेतला.त्यांनी यूपीएससी परीक्षा पास केली आणि त्या आयपीएस अधिकारी बनल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Govinda Sunita Divorce: गोविंदा आणि सुनीताच्या घटास्फोटवर वकिलाचा मोठा खुलासा; म्हणाले...

Ganesh Chaturthi 2025 : गणपती बाप्पाचा आवडता प्रसाद कोणता? जाणून घ्या खास नैवेद्याची संपूर्ण यादी

Ganesh Chaturthi 2025 : सुखकर्ता, दु:खहर्ता...; गणपतीच्या 'या' ५ आरत्या आताच करा तोंडपाठ

Supreme Court : सावधान! तुम्हीही कार-बाइकमध्ये 'हे' पेट्रोल टाकताय? प्रकरण थेट SC पर्यंत पोहोचलं

Maharashtra Live News Update: मुंबईला जाण्यापूर्वी बीडमध्ये उद्या मनोज जरांगे पाटील यांची अंतिम निर्णायक सभा

SCROLL FOR NEXT