Success Story Saam Tv
बिझनेस

Success Story: सरकारी नोकरी करत दिली UPSC; पाचव्या प्रयत्नात झाल्या IPS; मोहिता शर्मा यांचा प्रेरणादायी प्रवास

Success Story of IPS Mohita Sharma: आयपीएस मोहिता शर्मा या अनेकदा चर्चेत असतात. अमिताभ बच्चनदेखील मोहिता शर्मा यांचे चाहते आहेत. त्यांनी २०१६ मध्ये यूपीएससी परीक्षा पास केली होती.

Siddhi Hande

IPS मोहिता शर्मा यांचा प्रेरणादायी प्रवास

पाचव्या प्रयत्नात केली यूपीएससी क्रॅक

कौन बनेगा करोडपतीमध्ये जिंकले होते १ कोटी रुपये

यूपीएससी परीक्षा देऊन आयएएस, आयपीएस होण्याचे अनेकांचे स्वप्न असते. त्यासाठी अनेकजण खूप मेहनत करतात. यूपीएससी परीक्षा देऊन प्रशासकीय सेवेत काम करुन काहीतरीबदल करण्याचे अनेकांचे स्वप्न असते. यासाठी अनेकजण दिवसरात्र मेहनत घेतात.असंच काहीसं मोहिता शर्मा यांनी यांनी केली. त्यांनी शेवटच्या प्रयत्नात यूपीएससी परीक्षा पास केली.

मोहिता शर्मा यांचे शिक्षण

मोहिता शर्मा यांनी २०१६ मध्ये ५ व्या प्रयत्नात यूपीएससी(UPSC) परीक्षा पास केली. मोहिता शर्मा या मूळच्या हिमाचल कांगडा येथील रहिवासी. त्यांचे वडील मारुती कंपनीत काम करत होते तर आई गृहिणी होत्या. मोहिता यांची आर्थिक परिस्थिती फार काही बरी नव्हती. परंतु त्यांनी मोहिता यांच्या शिक्षणात कोणतीही कसर सोडली नाही. मोहिता शर्मा यांनी दिल्ली पब्लिक स्कूलमधून शालेय शिक्षण घेतले. यानंतर त्यांनी २०१२ मध्ये भारती विद्यापीठातून कॉलेज ऑफ इंजिनियरिंगमधून बी.टेकचे शिक्षण पूर्ण केले.

मोहिता शर्मा यांनी ग्रॅज्युएशन पूर्ण केल्यानंतर २०१६ मध्ये असिस्टंट सेक्शन ऑफिसर पदावर काम केले. त्यांनी इलेक्शन कमिशनमध्ये सरकारी नोकरी केली. नोकरी करताना त्यांनी यूपीएससी परीक्षेची तयारी सुरु केली. २०१६ मध्ये पाचव्या प्रयत्नात त्यांनी यूपीएससी परीक्षा पास केली. २०१७ मध्ये त्या आयपीएस पदावर रुजू झाल्या.

प्रसिद्ध अभिनेते अमिताभ बच्चन हेदेखील मोहिता शर्मा यांचे चाहते आहेत. मोहिता शर्मा यांनी केबीसी सीझन १२मध्ये सहभाग घेतला होता. यावेळी त्यांनी १ कोटी रुपये जिंकले होते. त्यानंतर त्यांची खूप चर्चा झाली होती. मोहिता शर्मा या एक निर्भीड आयपीएस अधिकारी आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! भाजपच्या बड्या नेत्याच्या भावाला अटक, मारहाण प्रकरण भोवलं

विश्वचषक विजेता कर्णधार भ्रष्टाचारात अडकला, कोणत्याही क्षणी अटक होणार? श्रीलंकेत वातावरण तापलं

Christmas Celebration : ख्रिसमस सेलिब्रेशन करायचे असेल तर, मुंबईतील माउंट मेरी चर्चला नक्कीच भेट द्या

Dhurandhar Collection : 'धुरंधर'ची ४०० कोटींकडे वाटचाल; 'छावा'चा रेकॉर्ड मोडणार? कपिलचा चित्रपट तिकीट खिडकीवर आपटला, वाचा कलेक्शन

Jio Recharge 2026: JIOने दिली खुशखबर! 2026 मध्ये रिचार्ज होणार स्वस्त, फक्त १०३ रुपयांपासून सुरुवात, वाचा संपूर्ण प्लान...

SCROLL FOR NEXT