Success Story Saam Tv
बिझनेस

Success Story: LLB केलं, नंतर पहिल्याच प्रयत्नात UPSC क्रॅक; IPS दलजित सिंह चौधरी यांचा प्रवास

Success Story of IPS Daljit Singh Chawdhary: आयपीएस दलजित सिंह चौधरी यांनी खूप मेहनतीने यूपीएससी परीक्षा पास केली. त्यांनी सुरुवातीला कायद्याचे शिक्षण घेतले.

Siddhi Hande

आयपीएस दलजित सिंह चौधरी यांता प्रवास

३४ वर्षांच्या सर्व्हिसनंतर निवृत्ती

कायद्याचे शिक्षण घेतल्यानंतर दिली यूपीएससी

यूपीएससी ही देशातील सर्वात प्रतिष्ठित आणि अवघड परीक्षा आहे. यूपीएससी परीक्षा पास करण्यासाठी दिवसरात्र मेहनत करावी लागते. अनेकांचे आयएएस, आयपीएस होण्याचे स्वप्न असते. त्यासाठी खूप मेहनत करावी लागते. अशीच मेहनत आयपीएस दलजीत सिंह चौधरी यांनी केली. त्यांनी खूप मेहनतीने यूपीएससी परीक्षा पास केली.

३४ वर्षांची सर्व्हिस

दलजित सिंह चौधरी हे १९९० बॅचचे आयपीएस अधिकारी होते. मागच्या वर्षी २०२५ मध्ये त्यांची निवृत्ती झाली. दरम्यान, त्यांचा हा प्रवास खूपच प्रेरणादायी आहे. त्यांनी एकूण ३४ वर्षे सर्व्हिस केली.

दलजित सिंह चौधरी यांनी सुरुवातीला कायद्याचे शिक्षण घेतले.त्यानंतर त्यांनी यूपीएससी परीक्षेची तयारी केली. दलजित सिंह चौधरी यांचा जन्म २५ लाख १९६५ रोजी दिल्लीत झाला. त्यांनी बीएससी केले त्यानंतर एलएलबीची डिग्री प्राप्त केली.

कायद्याचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर दलजित यांनी सिविल सर्व्हिसेसची तयारी केली. यानंतर यूपीएससी परीक्षा पास केली. त्यांनी १९९० मध्ये यूपीएससी परीक्षा दिली आणि आयपीएस पदाला गवसणी घातली.

दलजित सिंह यांना करिअरच्या सुरुवातीला उत्तर प्रदेशमधील सर्वात अवघड ठिकाणी पोस्टिंग मिळाली. त्यांनी या ठिकाणी खूप चांगले काम केले. गुन्हेगार त्यांना खूप घाबरत होते. त्यांन अनेकांचे एन्काउंटरदेखील केले आहेत. त्यांचे नाव ऐकूनच अनेक गुन्हेगार घाबरायचे. त्यांचा हा प्रवास सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

SRH vs RR, IPL 2026: वैभव सूर्यवंशीची फटकेबाजी अन् आर्चरच्या भेदक गोलंदाजी पुढे हैदराबाद गारद; आता गुजरातशी भिडणार राजस्थान

नागपूरमध्ये इबोलाचा अलर्ट; युगांडावरून आलेला नागरिक होम आयसोलेशनमध्ये

Mumbai Crime: मुंबईत रक्तरंजित थरार! रिक्षाचालक समजून दुसऱ्यालाच संपवलं, धारदार शस्त्राने वार करत हत्या

ठाणेकरांची चिंता वाढली; बारवी धरणात फक्त इतकाच पाणीसाठा शिल्लक

Accident: भरधाव डंपरची रिक्षाला धडक, ५ जणांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT