Success Story Saam Tv
बिझनेस

Success Story: लहानपणी आईवडिलांचे छत्र हरपलं, आजीने मोठं केलं, सलग ५ वेळा अपयश, ६व्या प्रयत्नात IPS; अंशिका जैन यांचा प्रवास

IPS Anshika Jain Success Story: आयपीएस अंशिका जैन यांनी खूप संघर्ष केला. त्यांनी सहाव्या प्रयत्नात यूपीएससी परीक्षा पास केली. त्या सध्या आयपीएस अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.

Siddhi Hande

IPS अंशिका जैन यांचा प्रेरणादायी प्रवास

सहाव्या प्रयत्नात यूपीएससी पास

मेहनत आणि सातत्याच्या जोरावर मिळवले यश

प्रत्येकाची काही न काही स्वप्ने असतात. आपली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी खूप मेहनत घ्यायची असते. मेहनत आणि इच्छाशक्तीच्या जोरावर तुम्ही खूप यशस्वी होऊ शकतात. त्यासाठी तुम्हाला सातत्य ठेवायला लागते. असंच सातत्य अंशिका जैन यांनी ठेवलं आणि यूपीएससी परीक्षा पास केली. आज त्या आयपीएस अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.

अंशिका जैन ५ वर्षांच्या असतानाच त्यांच्या आईवडिलांचे दुःखद निधन झाले. आई वडिलांशिवाय त्या लहानाच्या मोठ्या झाल्या. त्यांच्या आजीने आणि काकाने त्यांचे पालनपोषण केले. त्यांची आजी शिक्षिका होत्या.त्या नेहमी सांगायच्या की, शिक्षण हीच खरी संपत्ती आहे. त्यांच्या आजीनेच त्यांना सिविल सर्व्हिसमध्ये काम करण्यासाठी प्रेरणा दिली.

यूपीएससीसाठी नोकरी सोडली (UPSC Success Story)

अंशिका या मूळच्या दिल्लीच्या रहिवासी. त्यांनी सुरुवातीचे शिक्षण दिल्ली युनिव्हर्सिटीमधून पूर्ण केले. त्यांनी बी.कॉम डिग्री प्राप्त केली. त्यानंतर त्यांनी एम.कॉम केले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना चांगल्या कंपनी नोकरी मिळाली होती परंतु त्यांनी ही नोकरी सोडली. त्यांनी यूपीएससी परीक्षेची तयारी केली.

यूपीएससी परीक्षेची तयारी करत असतानाच २०१९ मध्ये त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. त्यांच्या आजीचे दुःखद निधन झाले. यामुळे त्या पूर्ण खचल्या होत्या. परंतु त्यांनी तरीही हार मानली नाही. आजीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी पुन्हा परीक्षेचा अभ्यास सुरु केला.

अंशिका यांच्यासाठी हा प्रवास सोपा नव्हता. त्यांना सलग ५ वेळा अपयश आले होते. त्यानंतर त्यांनी आपल्या अभ्यासाची स्ट्रॅटेजी बदलली. त्यांनी २०२२ मध्ये सहाव्या प्रयत्नात यश मिळवले. त्यांनी यूपीएससीत ३०६ रँक प्राप्त केली. त्यांचा हा प्रवास सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: राज ठाकरे मविआत सामिल होणार? मनसेसाठी शरद पवार आग्रही?

Maharashtra Live News Update: ओंकार हत्तीवर फटाके फेकल्याचा व्हिडिओ, वनविभागाकडून खुलासा

Radhakrishna Vikhe Patil: विखेंचं शेतकऱ्यांच्या जखमांवर मीठ! कर्जमाफीवरून वादग्रस्त विधानानं पेटला वाद

Crime News : संतापजनक! क्लासवरून घरी येताना वाटेत गाठलं, ६ वर्षीय बालिकेवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार, नांदेड हादरलं

Maharashtra Politics: आदित्य ठाकरे मुंबईचे महापौर होणार? राजकीय चर्चांना उधाण|VIDEO

SCROLL FOR NEXT