Success Story Saam Tv
बिझनेस

Success Story: अपयश आले पण हार मानली नाही, कोचिंग क्लासशिवाय UPSC क्रॅक, शेतकऱ्याची लेक झाली IAS, वाचा यशोगाथा

Success Story Of IAS Tapsya Parihar: आयएएस तपस्या परिहार यांनी कोणत्याही कोचिंग क्लासेसशिवाय यूपीएससी परीक्षा क्रॅक केली आहे. एका शेतकऱ्याच्या लेकीनं हे यश मिळवलं आहे.

Siddhi Hande

देशातील लाखो तरुण दरवर्षी यूपीएससी परीक्षा देतात. यूपीएससी परीक्षा देऊन आयएएस, आयपीएस अधिकारी होण्याचे अनेकांचे स्वप्न असते. परंतु हे यश मिळवणे एवढे सोपे नसते. त्यासाठी दिवसरात्र एक करुन मेहनत करावी लागते.असंच काहीसं तपस्या परिहार यांनी केलं. त्यांनी खूप कमी वयात यूपीएससी (UPSC) परीक्षा क्रॅक केली. जिथे इच्छा तिथे मार्ग असा त्यांच्या जीवनाचा परिचय आहे.

आयएएस तपस्या परिहार (IAS Tapsya Parihar) यांच्याही वाटेत अनेक अडचणी आल्या. परंतु त्यांनी हार मानली नाही. त्या २०१८ च्या बॅचच्या आयएएस अधिकारी आहेत. त्यांनी २०१७ मध्ये यूपीएससी परीक्षेत २३वी रँक प्राप्त केली.

तपस्या या मध्य प्रदेशच्या रहिवासी आहेत. त्यांचे वडिल मध्य प्रदेशमधील नरसिंहपुर येथील शेतकरी आहेत.शेतकऱ्याच्या लेकीने यूपीएससी परीक्षा क्रॅक करुन मोठं यश मिळवलं आहे. त्यांच्या कुटुंबासाठी हा खूप आनंदाचा दिवस आहे.

मिडिया रिपोर्टनुसार, तपस्या परिहार यांनी आपले शिक्षण केंद्रीय विद्यालयातून पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी पुण्यातील इंडियन लॉ सोसायटी लॉ कॉलेजमध्ये अॅडमिशन घेतले. त्यांनी कायद्याचे शिक्षण घेतले. यानंतर त्यांनी यूपीएससी परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. त्यांनी पहिल्या प्रयत्नात प्रिलियम्सदेखल उत्तीर्ण केले नाही.

अपयश आल्यानंतर तपस्या या निराश झाल्या. परंतु त्यांनी पुन्हा मनापासून अभ्यास केला आणि परीक्षा दिली. त्यांना दुसऱ्या प्रयत्नात यश मिळाले आणि त्या आयएएस अधिकारी झाल्या.

यूपीएससी (UPSC)परीक्षेची तयारी करत असताना तपस्या यांनी कोणतेही कोचिंग क्लासेस लावले नव्हते. त्यांनी फक्त सेल्फ स्टडी केले होते. सेल्फ स्टडी करुन त्यांनी एवढे मोठे यश मिळवले आहे. त्या सतत काहीतरी नवीन शिकायच्या. त्यांच्या या यशामुळे अनेकांना प्रेरणा मिळाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bomb Blast: 11 आरोपी निर्दोष,मग बॉम्बस्फोट कुणी केले?

Political Clash: छावा विरुद्ध राष्ट्रवादी, महाराष्ट्रात वाद पेटला

Pune Crime : मुलाने प्रॉपर्टीसाठी छळ करायची सीमा गाठली; आईला वृद्धाश्रमात धाडलं, बहिणीला मनोरुग्णालयात, पुण्यातील प्रकार

Manikrao Kokate: रमी खेळणं कृषीमंत्र्यांना भोवणार? वाचाळवीर कोकाटेंचं मंत्रिपद जाणार?

Jagdeep Dhankhar Resign : मोठी बातमी! जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा, कारणही समोर

SCROLL FOR NEXT