Birdev Donne : धनगराच्या पालावर क्रांतीची नवी पहाट, मेंढ्या चारत चारत अभ्यास केला; कागलचा बिरोबा IPS झाला

Birdev Donne IPS : बिरदेव यांचे प्राथमिक शिक्षण यमगेच्या विद्यामंदीर या शाळेत झाले तर माध्यमिक शिक्षण जय महाराष्ट्र हायस्कूल यमगे येथे झालं आहे. उच्च माध्यमिक शिक्षण त्यांनी मुरगूडच्या शिवराज विद्यालय ज्युनिअर कॉलेजमध्ये घेतलं आहे.
Birdev Dhone IPS
Birdev Dhone IPSSaam Tv News
Published On

कोल्हापूर : आपल्या चिकाटीच्या जोरावर कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील यमगे येथील बिरदेव सिद्धाप्पा डोणे या तरुणाने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण होऊन आयपीएस (IPS) अधिकारी बनण्याचं स्वप्न सत्यात उतरवलं आहे. याचा आनंद त्यांनी कुटूंबासमवेत बेळगाव जिल्ह्यात मेंढरं चारत साजरा केला.

सध्या बिरदेव हे बेळगाव जिल्ह्यातील खानापूर परिसरात वास्तव्यास आहेत. आपण आयपीएस उत्तीर्ण होणार याची खात्री त्यांना होती. त्यामुळे आपल्याला परत मेंढरामध्ये जाता येणार नाही म्हणून ते चार दिवसापूर्वीच कर्नाटकात गेले होते. एका मेंढपाळाच्या मुलाने अवघ्या २७व्या वर्षी उच्चपदस्थ अधिकारी पदावर मोहर उमटवली आहे, त्यामुळे त्यांचं सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.

Birdev Dhone IPS
Sanjay Lele Family Pahalgam attack : माझ्या बाबांचं डोकं रक्ताने माखलेलं, संजय लेलेंच्या मुलाने सांगितली हादरवणारी कहाणी

केंद्र शासनाने २०२४ मध्ये घेतलेल्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा निकाल मंगळवारी दुपारी जाहीर झाला. त्यामध्ये बिरदेव सिद्धाप्पा डोणे हे उत्तीर्ण झाल्याचं समजताच त्ंयाच्या जन्मगावी यमगे येथे बिरदेव यांच्या अनुपस्थितीत त्यांच्या मित्र परिवाराने मोठ्या प्रमाणात जल्लोष केला. यमगे येथे त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात येणार असून त्यासाठीची तयारी सुरु झाली आहे.

बिरदेव यांचे प्राथमिक शिक्षण यमगेच्या विद्यामंदीर या शाळेत झाले तर माध्यमिक शिक्षण जय महाराष्ट्र हायस्कूल यमगे येथे झालं आहे. उच्च माध्यमिक शिक्षण त्यांनी मुरगूडच्या शिवराज विद्यालय ज्युनिअर कॉलेजमध्ये घेतलं आहे. तसेच इंजिनिअरिंगची पदवी त्यांनी पुण्याच्या सीओईपी या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये घेतलीय. स्पर्धा परिक्षेच्या अभ्यासाठी त्यांनी थेट देशाची राजधानी गाठली. बिरदेव यांनी दिल्लीमध्ये आयपीएस (IPS)परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठीचे क्लास सुरु ठेवले. याठिकाणी त्यांनी दिवसातील २४ तासामधील सर्वाधिक वेळ अभ्यास करण्यात खर्ची केला. काहीही झालं तरी आयपीएस व्हायचचं हे ध्येय डोळ्यासमोर ठेवलेल्या बिरदेव यांनी अखेर यशाला गवसणी घातली.

बिरदेव दिल्लीत यूपीएससीचा (UPSC)अभ्यास करत होते. महिन्याला १०-१२ हजार रुपये त्यांना खर्चासाठी पाठवणं वडिलांना कठीण होत चाललं होतं. त्यामुळे 'हा नाद सोड आणि एखादी नोकरी कर,' असा तगादा वडिलांनी त्यांच्याकडे लावला होता. मात्र, आपण आयपीएस परीक्षेत यशस्वी होणारच ही जिद्द बिरदेव यांनी बोलून दाखवली होती, आणि आज ते खरं ठरलं. आपला लेक क्लास वन अधिकारी झाल्याने कुटुंबियांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले.

Birdev Dhone IPS
Santosh Bangar : पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी फक्त एक तास द्या; आमदार संतोष बांगर यांचं PM मोदींना आवाहन

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com