Success Story Saam TV
बिझनेस

Success Story : नकोशीनं कुटुंबाचं नाव केलं! सासरच्यांमुळे ती IAS झाली, आता अमरावतीची कलेक्टर; वाचा संजीता महापात्रा यांचा प्रवास

Success Story of IAS Sanjita Mohanpatra: अमरावतीच्या कलेक्टर संजीता माहापात्रा या त्यांच्या कामामुळे ओळखल्या जातात. त्यांनी ५ व्या प्रयत्नात यूपीएससी परीक्षा पास केली. सासरच्या सपोर्टमुळे त्यांनी आयएएस पदाला गवसणी घातली.

Siddhi Hande

IAS संजिता महापात्रा यांचा प्रेरणादायी प्रवास

लेकीच्या जन्मानंतर कुटुंब होते दुःखी

त्याच लेकीने केले कुटुंबाचे नाव मोठे

अनेकदा आपल्या नशिबात काय लिहलंय हे कोणालाच ठाऊक नसतं. कधीकधी तर जन्माला येण्याआधीच अनेक संकटे समोर उभी असतात. परंतु कितीही अडचणी आल्या तरीही त्यावर मात करता यायला हवी. असंच काहीसं संजीता महापात्रा यांनी केली. त्यांच्या जन्मानंतर कुटुंबियांना फार आनंद झाला नव्हता. मुलगी जन्माला आल्यानंतर त्यांना फार काही बरे वाटले नव्हते. त्यांना मुलगा हवा होता. परंतु याच मुलीने त्यांच्या कुटुंबाचे नाव मोठे केले. आज त्या आयएएस अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.

संजीता महापात्रा यांचा प्रवास

संजीता महापात्रा या मूळच्या ओडिशामधील राउरकेला येथील रहिवासी. त्यांचा जन्म गरीब कुटुंबात झाला. त्यांच्या कुटुंबियांनी जवळपास त्यांना सोडून दिले होते. परंतु मोठ्या बहिणीच्या आग्रहाखातर कुटुंबियांनी त्यांना ठेवून घेतले. त्यांचे बालपण खूप गरीबीत गेले. त्यांच्या शिक्षणाच्या खर्चासाठी त्यांना शिक्षक, सामाजिक संघटना आणि स्कॉलरशिपवर अवलंबून राहावे लागते.

संजीता महापात्रा यांनी मेकॅनिकल इंजिनियरिंग केले. त्यानंतर त्यांनी स्टील ऑथोरिटी ऑफ इंडियामध्ये नोकरी केली. या काळात त्यांनी आईवडिलांसाठी गावी घर बांधले. त्यांनी आपल्या आईवडिलांना खूप मदत केली. संजीता यांना लहानपणापासूनच आयएएस व्हायचे होते. त्यांच्या सासरच्या मंडळींच्या सपोर्टमुळे त्यांनी हे स्वप्न पूर्ण केले.संजीता महापात्रा यांनी पाचव्या प्रयत्नात यूपीएससी परीक्षा पास केली. त्या सध्या अमरावती जिल्हा परिषदेत कलेक्टर म्हणून कार्यरत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kitchen Hacks : लाकडी चॉपिंग बोर्ड धुतल्यानंतरही दुर्गंधी येतेय? या घरगुती उपायांनी करा डीप क्लीन

Weight Loss : लाइफस्टाइलमध्ये करा 'हे' ३ बदल; फक्त ३० दिवसांत वजन होईल कमी अन् दिसाल सडपातळ

Maharashtra News Live Update: दहीहंडीत अश्लील नृत्य; डान्सर निशा मुंबईकर, शुभांगी थोरातसह ८ जणींवर गुन्हा

8th Pay Commission: केंद्रीय पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी! ₹22,450 पेन्शन वाढून ₹57,697 होणार? जाणून घ्या संपूर्ण गणित

IAS Transfer : मोठा प्रशासकीय फेरबदल! २७ IAS अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या, कुणाची कुठे नियुक्ती? वाचा

SCROLL FOR NEXT