Success Story Saam Tv
बिझनेस

Success Story: अभ्यास करता करता शेतीत राबला, एकदा दोनदा नव्हे तर तिनदा क्रॅक केली UPSC; शेतकऱ्याचा लेक झाला IAS

Success Story of IAS Ravi Sihag: आयएएस रवि सिहाग यांनी एकदा दोनदा नव्हे तर तीन वेळा यूपीएससी परीक्षा क्रॅक केली आहे. त्यांनी अभ्यासोबत शेतीतदेखील काम केले होते.

Siddhi Hande

केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा पास करण्याचे स्वप्न अनेकांचे असते. यूपीएससी परीक्षा पास करण्यासाठी तुम्हाला दिवसरात्र एक करुन अभ्यास करावा लागतो. अनेकदा परिस्थितीमुळे हार मानावी लागते. परंतु जी व्यक्ती परिस्थितीपुढे हार मानत नाही ती नक्कीच यशस्वी होते. असंच काहीस आयएएस रवि कुमार सिहाग यांच्यासोबत झालं. शेतकऱ्याच्या लेकाने यूपीएससी परीक्षा क्रॅक करुन आयएएस पदावर काम करण्याचे स्वप्न पूर्ण केले आहे. (IAS Ravi Sihag Success Story)

आयएएस रवि कुमार सिहाग यांचा जन्म २ नोव्हेंबर १९९५ रोजी राजस्थानमधील श्रीगंगा नगर जिल्ह्यात झाला. त्यांचे वडील रामकुमार हे शेतकरी आहेत.त्यांची आई गृहिणी आहेत.

रवि सिहाग यांनी ग्रॅज्युएशनपर्यंत अभ्यासासोबत आपल्या वडिलांना कामात मदत केली. त्यांना शेतीतील सर्व कामे येतात. रवि यांनी सातवीपर्यंतचे शिक्षण त्यांच्या गावात केले. त्यानंतर अकरावीपर्यंत अनूपगडच्या शारदा स्कूलमधून केले. यानंतर १२वी पर्यंतचे शिक्षण विजयनगरच्या सीनियर सेकंडरी स्कूलमधून केले. त्यांनी बीएपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. (IAS Success Story)

आयएएस रवि सिहाग यांनी ४ वेळा यूपीएससी परीक्षा दिली. यात ३ वेळा त्यांना यश मिळाले. त्यांना २०१८ मध्ये ३३१ रँक प्राप्त झाली. तेव्हा त्यांना भारतीय रक्षा लेखा सेवा कॅडर मिळाले. २०२९ मध्ये त्यांना आयआरटीएस कॅडर मिळाले.

रवि सिहाग यांनी२०२० मध्ये तिसऱ्यांदा सिविल परीक्षा दिली. त्यावेळी ते अयशस्वी ठरले. यानंतर त्यांनी हार मानली नाही. त्यांनी २०२१ मध्ये चौथ्यांदा यूपीएससी (UPSC) परीक्षा क्रॅक केली. त्यांना १८वी रँक प्राप्त केली. रवि सिहाग यांनी हिंदी माध्यमातून परीक्षा दिली होती. हिंदी माध्यातून परीक्षा देणाऱ्यांमध्ये रवि सिहाग हे टॉपर होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : नागपुरातील दक्षिणामूर्ती गणेश मंडळाचा गणपती बडकस चौकात पोहचणार

Sahara India Scam : सहारा इंडियाच्या विरोधात ईडीची मोठी कारवाई; सुब्रतो रॉय यांच्या पत्नी, मुलांच्या अडचणीत वाढ

Zakir Khan: 'प्रकरण हाताबाहेर जाण्यापूर्वी...' झाकीर खानने केली मोठी घोषणा, स्टेज शोमधून घेणार ब्रेक

नाशिकमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीत शिवतांडव नृत्य ठरले विशेष आकर्षण|VIDEO

IPS अंजना कृष्णा प्रकरणात मिटकरींचा यू-टर्न; आधी चौकशीची मागणी,आता दिलगिरी

SCROLL FOR NEXT