Success Story Saam Tv
बिझनेस

Success Story: आधी डॉक्टर मग IAS; पालघरच्या निर्भीड अन् कडक शिस्तीच्या जिल्हाधिकारी इंदुराणी जाखड आहेत तरी कोण?

Success Story of Palghar Collector Indurani Jakhar: डॉ. इंदुराणी जाखड या निर्भीड आणि कडक शिस्तीच्या आयएएस अधिकारी आहेत. त्या आधी डॉक्टर झाल्या त्यानंतर त्यांनी यूपीएससी परीक्षा पास केली.

Siddhi Hande

पालघरच्या जिल्हाधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांचा प्रवास

आधी डॉक्टर झाल्या मग IAS अधिकारी

गडचिरोलीसारख्या माओवादी क्षेत्रात केलंय काम

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या पहिल्या महिला आयुक्त

यूपीएससी परीक्षा देऊन आयएएस होऊन प्रशासकीय सेवेत बदल घडवून आणण्याचे अनेकांचे स्वप्न असते. दरम्यान, जिल्हाधिकारी होऊन प्रशासकीय व्यवस्थेत बदल घडवून अनेकजण प्रयत्न करतात. असंच काहीसं डॉ. इंदुराणी जाखड यांनी केलं. गडचिरोलीसारख्या माओवादाने ग्रस्त असलेल्या जिल्ह्यातदेखील त्यांनी मोठी जबाबदारी पार पाडली. त्या सध्या पालघरच्या जिल्हाधिकारी आहेत. डॉ. इंदुराणी जाखड या निर्भीड, कडक शिस्तीच्या जिल्हाधिकारी आहेत. त्या नेहमी आपल्या पदाला साजेसं काम करतात. त्यांचे सर्वत्र कौतुक होते.

पालघरच्या जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत (Palghar District Collector)

पालघरसारख्या आदिवासीबहुल जिल्ह्यात बदल घडवून आणण्यासाठी डॉ.इंदुराणी जाखड प्रयत्न करतात.त्यांचा यूपीएससी परीक्षेचा प्रवास खूप खडतर होता. तरीही त्यांनी यश मिळवले.

डॉ.इंदुराणी जाखड या मूळच्या हरियाणातील झज्जर येथील रहिवासी. त्यांचा जन्म २६ ऑगस्ट १९९१ रोजी झाला. त्यांचे आई-वडील दिल्लीत राहत होते. त्यामुळे त्यांचे शिक्षणदेखील दिल्लीत झाले. दिल्लीतील मौलाना अबुल कलाम आझाद मेडिकल कॉलेजमधून त्यांनी एमबीबीएस पदवी प्राप्त केली. त्या डॉक्टर झाल्या.

आधी डॉक्टर मग IAS अधिकारी (Dr.Indurani Jakhar Success Story)

इंदुराणी या डॉक्टर झाल्यानंतर त्यांच्या मनात प्रश्न निर्माण झाला. आरोग्य सेवेत काम करायचे की प्रशासकीय सेवेत जायचे असा संभ्रम त्यांच्या मनात निर्माण झाला. शेवटी त्यांनी प्रशासकीय सेवेत जाण्याचा निर्णय घेतला आणि त्यांनी यूपीएससी परीक्षा दिली. २०१६ मध्ये डॉ. इंदुराणी जाखड या आयएएस अधिकारी झाल्या.

कल्याण डोबिंवली महानगरपालिकेच्या पहिल्या आयुक्त

डॉ. इंदुराणी जाखड या कल्याण डोबिंवली महानगरपालिकेच्यादेखील आयुक्त होत्या. त्या महानगरपालिकेच्या पहिल्या महिला आयुक्त झाल्या होत्या. त्यांनी यूपीएससी परीक्षेत ३०वी रँक प्राप्त केली.

इंदुराणी यांचे वडील दिल्ली पोलिसात कार्यरत होते. त्यांचे बालपण खूप चांगल्या परिस्थितीत गेले. एमबीबीएस डिग्री प्राप्त केल्यानंतर त्यांनी यूपीएससी परीक्षेची तयारी केली. यानंतर त्यांनी यूपीएससी परीक्षा दिली. त्यांच्या या प्रवासात त्यांच्या कुटुंबाने त्यांची साथ दिली. त्यामुळेच त्यांना यश मिळालं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bollywood Actor Arrest : मोठी बातमी! बॉलिवूड अभिनेत्याला अटक, ३५ कोटींचे कोकेन जप्त

Maharashtra Live News Update: पंढरपुरात चंद्रभागाने इशारा पातळी गाठली; नदीकाठी पूरस्थिती

दसऱ्याआधीच सोनं महागलं, दरात कमालीची उच्चांकी; २४ कॅरेट सोन्याच्या भावात किती रूपयांची वाढ?

Dhanashree Verma : युजवेंद्र चहलनं धोका दिला? लग्नाच्या दोन महिन्यात रंगेहात पकडल्याचा दावा, काय म्हणाली धनश्री वर्मा? पाहा VIDEO

First Period: पहिल्या पिरीयड्स नंतरचा ‘तो’ टप्पा…! मुलीच्या विचारसरणीपासून जीवनशैलीपर्यंत होणारे मोठे बदल

SCROLL FOR NEXT