
लेफ्टनंट कशिश मेथवानी यांचा प्रवास
आर्मी स्कूलमधून शिक्षण
मिस इंडिया किताब पटकावला
मिस इंडिया ते आर्मी ऑफिसर प्रवास
प्रत्येकाचे काही न काही स्वप्न असते. प्रत्येकजण आपल्या स्वप्नांचा पाठलाग करत असतो. यासाठी खूप मेहनत घेतात. प्रत्येकाला काहीतरी वेगळं करायचं असतं. काहींना हिरो-हिरोईन व्हायचं असतं तर काहींना देशसेवा करायची असते. परंतु आज आपण अशा एका व्यक्तिमत्त्वाबद्दल बोलणार आहोत, ज्यांनी मिस इंटरनॅशनल किताब जिंकूनदेखील आर्मीत भरती व्हायचा निर्णय घेतला. ग्लॅमरविश्वाला रामराम ठोकत त्यांनी देशसेवा करण्याचा निर्णय घेतला.
कशिश मेथवानी यांचा प्रवास
कशिश मेथवानी यांनी खूप मेहनत घेतली. त्याचेच फळ त्यांना मिळाले. त्यांचा जन्म ९ जानेवारी २००१ रोजी झाला. त्या लहानपणापासूनच अभ्यासात खूप हुशार होत्या. कशिश यांचे वडिल शास्त्रज्ञ आहे. ते सुरक्षा मंत्रालयात क्वालिटी अश्युरन्स विभागात डायरेक्टर जनरल पदावर कार्यरत होते. तर आई शोभा मेथवानी या पुण्यात आर्मी स्कूलमध्ये शिक्षिका होत्या.
मिस इंडिया ते आर्मी भरती
कशिश यांचा प्रवास खूपच प्रेरणादायी आहे. त्यांनी अनेक स्पर्धा जिंकल्या. त्यांनी मिस इंटरनॅशनल इंडिया २०२३ चा किताब पटकावला. ब्युटी विथ ब्रेनचं उत्तम उदाहरण म्हणजे कशिश आहेत. याचसोबत त्यांनी भारतीय सैन्यात भरती होण्यासाठी प्रयत्न केले. त्यांनी लहानपणीच एनसीसी जॉइन केले होते.
कशिश मेथवानी यांचे शिक्षण
कशिश मेथवानी या लहानपणापासूनच खूप हुशार होत्या. त्यांनी आर्मी पब्लिक स्कूलमधून १२वी पास केले. त्यानंतर सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीमधून बायोटेक्नोलॉजीमधून मास्टर्स डिग्री प्राप्त केली. यानंतर त्यांनी बंगळुरु इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समधून न्यूरोसायन्सवर थिसीस केले. त्यांनी हॉवर्ड युनिव्हर्सिटीमध्ये पीएचडी करण्यासाठी ऑफरदेखील मिळवली होती. परंतु त्यांनी सैन्यात भरती होण्याचा निर्णय घेतला.
कॉलेजमध्ये असताना अनेक स्पर्धा जिंकल्या
कशिश या कॉलेजमध्ये असतानाच अनेक स्पर्धांमध्ये सहभागी झाल्या होत्या. २०२३ मध्ये त्यांनी मिस इंटरनॅशनल इंडियाचा किताब जिंकला. त्यांनी मॉडेलिंग आणि अभिनयासाठी ऑफर मिळाल्या होत्या.कशिश यांनी यूपीएससी सीडीएस २०२४ मध्ये ऑल इंडिया रँक २ प्राप्त केली होती.
सीडीएस परीक्षा पास केल्यानंतर त्यांनी ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी, चेन्नई येथे गेल्या. त्यानंतर ११ महिन्याच्या ट्रेनिंगनंतर त्यांना ६ सप्टेंबर २०२५ रोजी लेफ्टनंट पद मिळाले. त्यांचा हा प्रवास प्रत्येक तरुणासाठी प्रेरणादायी आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.